IND vs ENG, Video : यशस्वी जयस्वाल बाद होताच रोहित शर्मा वैतागला, बॉडी लँग्वेजमधून बरंच बोलला

भारत विरुद्ध चौथ्या कसोटी सामन्यात ध्रुव जुरेल आणि अश्विन-जडेजा यांच्या खेळीमुळे टीम इंडिया विजयाच्या ट्रॅकवर आली. इंग्लंडने विजयासाठी १९२ धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान पिच पाहता वाटतं तितकं सोपं नव्हतं याची जाणीव कर्णधार रोहित शर्माला होती. त्यामुळे यशस्वी जयस्वालची विकेट जाताच नाराजी व्यक्त केली.

IND vs ENG, Video : यशस्वी जयस्वाल बाद होताच रोहित शर्मा वैतागला, बॉडी लँग्वेजमधून बरंच बोलला
IND vs ENG, Video : यशस्वी जयस्वालचं तसं आऊट होणं रोहितला रूचलं नाही, भर मैदानातच दिली प्रतिक्रिया
| Updated on: Feb 26, 2024 | 12:57 PM

मुंबई : भारत इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. मालिकेत भारताने आघाडी घेतली असून चौथा सामनाही विजयाच्या वेशीवर आहे. पण टीम इंडियाचे तीन गडी झटपट बाद झाले आणि इंग्लंडने दिलेलं १९२ धावांचं आव्हानही कठीण वाटू लागलं. यशस्वी जयस्वालच्या रुपाने पहिली विकेट जाताच रोहित शर्माच्या चेहऱ्यावर तात्काळ नाराजी दिसली. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा टीम इंडियाने एकही गडी न गमवता ४० धावा केल्या होत्या आणि १५२ धावांची आवश्यकता होती. त्यामुळे विजय दृष्टीक्षेपात होता. विराट कोहली आणि केएल राहुल यांची अनुपस्थिती पाहता विजयी धावांचा पाठलाग करण्यासाठी मधल्या फळीवर अवलंबून राहणं महागात पडू शकतं, याची जाणीव कर्णधार रोहित शर्मा याला होती. त्यामुळे काही सूचना रोहित शर्माने यशस्वीला दिल्या असतील. पण संघाच्या ८४ धावा असताना चुकीचा फटका मारून बाद झाला. त्यामुळे रोहित शर्माची नाराजी स्पष्ट दिसली. समालोचक दिनेश कार्तिकने त्याचं योग्य विश्लेषण केलं.

दिनेश कार्तिक म्हणाला, रोहित शर्मा पूर्णपणे नाराज असल्याचं दिसून येत आहे. जयस्वालने रोहितच्या सूचनांचं उल्लंघन केल्याचं यातून स्पष्ट होतं. जयस्वालला धावा करण्याची घाई झाली होती. त्याला जो रूटच्या गोलंदाजीवर षटकार मारायचा होता. त्याची रणनिती इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने ओळखली आणि त्याप्रमाणे क्षेत्ररक्षण रचलं. जो रुटनेऑफसाईटला फ्लाइट चेंडू टाकला आणि जयस्वाल जाळ्यात अडकला. जयस्वालने पुढे येत उत्तुंग फटका मारण्यासाठी पुढे सरसावला. पण अँडरसनने त्याचा उत्तम झेल पकडला.

जयस्वाल बाद झाल्यानंतर ब्रॉडकास्टरने जेव्हा रोहित शर्माची प्रतिक्रिया दाखवली. तेव्हा तो पूर्णपणे नाराज असल्याचं दिसलं. यशस्वी जयस्वालच्या शॉट सिलेक्शनवर पूर्णपणे नाराज होता.रोहितच्या चेहऱ्यावरचे हावभाव बरंच काही सांगत होते. इतकंच काय तर शेवटी मान खाली घालून त्याने पिचवर बॅट आदळली. जयस्वाल बाद झाल्यानंतर विकेट्सची रांग लागली.  रोहित शर्मानंतर रजत पाटिदार आला तसा माघारी गेला. गिल आणि जडेजाने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. जडेजा बाद होताच सरफराज खान शून्यावर गेला. त्यामुळे टीम इंडियावर दडपण वाढलं.