Manchester Test : ‘त्या’ रात्री भारतीय खेळाडू रात्री 3 वाजेपर्यंत झोपले नाहीत, टीम इंडियाच्या टीकाकारांना दिनेश कार्तिकची सडेतोड उत्तरं

| Updated on: Sep 11, 2021 | 8:54 PM

भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये शेवटची कसोटी (Manchester Test) खेळला नाही. पण त्या सामन्याच्या आदल्या रात्री खेळाडूंमध्ये काय चालले होते, याबाबत यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने माहिती दिली आहे.

Manchester Test : त्या रात्री भारतीय खेळाडू रात्री 3 वाजेपर्यंत झोपले नाहीत, टीम इंडियाच्या टीकाकारांना दिनेश कार्तिकची सडेतोड उत्तरं
Dinesh karthik
Follow us on

लंडन : भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये शेवटची कसोटी (Manchester Test) खेळला नाही. पण त्या सामन्याच्या आदल्या रात्री खेळाडूंमध्ये काय चालले होते, याबाबत यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने माहिती दिली आहे. त्याने म्हटले आहे की, “इंग्लंडमध्ये उपस्थित असलेल्या भारतीय क्रिकेट संघाच्या काही खेळाडूंशी मी बोललो आहे आणि मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्डवर खेळवली जाणारी पाचवी आणि शेवटची कसोटी खेळण्यास ते इच्छूक का नाहीत, याबाबत जाणून घेण्याचा मी प्रयत्न केला.” (IND vs ENG : Dinesh karthik reveals the inside story of team india before manchester test called off)

दिनेश कार्तिक स्काय स्पोर्ट्सशी बोलत होता. तो म्हणाला की, “मी काही खेळाडूंशी (भारतीय) बोललो आहे. जवळजवळ सर्व सामने झाले आहेत आणि ते खूप थकले होते, त्यांच्याकडे सुरुवातीला दोन फिजिओ होते पण त्याआधीच एक फिजिओ प्रशिक्षकासह संघापासून विभक्त आहे. त्यानंतर त्यांच्याकडे फक्त एक फिजिओ होता. परंतु दुसरा फिजिओदेखील कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली.”

“दुसरा फिजिओ योगेश परमार हा देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने खेळाडूंमध्ये भीती निर्माण झाली. कारण पहिला फिजोओ कॉरोनाबाधित आढळल्याने संघातील सर्वच खेळाडू परमारच्या संपर्कात होते. त्याच्यासोबत प्रशिक्षण घेत होते. त्यामुळे ही बाब प्रत्येकासाठी भीतीची परिस्थिती निर्माण करणारी होती. गुरुवारी, सर्व खेळाडू आरटी-पीसीआर चाचणीमध्ये निगेटिव्ह आले. मात्र भीती कायम होती”

भीतीचं वातावरण

दिनेश कार्तिक म्हणाला की, “फिजीओच्या जागी दुसरा कोणी असता म्हणजेच लॉजिस्टिक्स, मदतनीस किंवा इतर कोणीही तरी फार मोठी समस्या निर्माण झाली नसती. पण जेव्हा कळले की, संघाचे फिजिओ पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत चिंता वाढली.”

दिनेश कार्तिकने सांगितले की, “संघातील अनेक खेळाडू शेवटच्या कसोटीच्या आदल्या रात्री तीन वाजेपर्यंत झोपू शकले नव्हते. अशा स्थितीत कोणताही खेळाडू दुसऱ्या दिवशी सामन्यासाठी तयार असणे अशक्य आहे.”

भारतीय खेळाडू रात्री 3 वाजेपर्यंत जागे राहिले

“आजचेच (10 सप्टेंबर) उदाहरण घ्या, दुसऱ्या दिवशीच्या सामन्यासाठी तयारी करायची की नाही हे माहित नसल्याने संघातील अनेक खेळाडू रात्री 2.30-3 पर्यंत झोपू शकले नाहीत. कारण भारतात खूप उशीर झाला होता आणि ते ईसीबीशी अशा गोष्टींवर बोलू शकतील की नाही याबाबत कोणतीही स्पष्टता नव्हती.”

सामना सुरु झाल्यानंतर खेळाडूचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असता तर?

कार्तिकने भीती व्यक्त केली की, “कसोटी पुढे ढकलली गेली हे चांगले आहे. कारण जर एखादा खेळाडू तीन दिवसांनंतर होणाऱ्या RT-PCR चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आला असता आणि तो प्लेइंग इलेव्हनमध्ये असता तर काय झाले असते?”

दिनेश कार्तिक आयपीएल संदर्भात उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांवर पुढे म्हणाला की, “तुम्हाला हे देखील समजले पाहिजे की, ही मालिका संपताच आयपीएल सुरू होणार, त्यानंतर वर्ल्ड कप आहे. आणि त्यानंतर न्यूझीलंडविरुद्धची मालिका. पण आपण फक्त या एका आठवड्याबद्दल बोलत आहोत.”

भारतीय संघ चार महिन्यांपासून बायो-बबलमध्ये

बायो बबलसंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नांविषयीही कार्तिक बोलला, तो म्हणाला की, “हे खेळाडू किती दिवस बबलमध्ये राहू शकले असते? 16 मे रोजी भारत सोडून ते इंग्लंडसाठी रवाना झाले. त्याआधीपासून ते बायो बबलमध्ये आहेत. आज त्यास चार महिने झाले आहेत. हा खूप मोठा कालावधी आहे. ही गोष्ट विचारात घ्यायला हवी.”

“भारतीय क्रिकेट संघ मे महिन्यापासून इंग्लंडमध्ये आहे. हा संघ आधी न्यूझीलंडसोबत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये खेळला आणि नंतर इंग्लंडसोबत एका मोठ्या कसोटी मालिकेत सहभागी झाला आहे.”

इतर बातम्या

Ind vs Eng : पाचवी टेस्ट रद्द, इंग्लंड क्रिकोट बोर्डाला 400 कोटींचा फटका, सौरव गांगुली तातडीनं इंग्लंडच्या दौऱ्यावर

Ind vs Eng : पाचवी टेस्ट रद्द, टीम इंडियानं मालिका विजयाची संधी गमावली? इंग्लंडला ‘असा’ होणार फायदा

चहलला विश्वचषकासाठी संघात स्थान न मिळाल्याने पत्नी धनश्री भावूक, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना, म्हणाली…

(IND vs ENG : Dinesh karthik reveals the inside story of team india before manchester test called off)