AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चहलला विश्वचषकासाठी संघात स्थान न मिळाल्याने पत्नी धनश्री भावूक, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना, म्हणाली…

भारताने टी-20 विश्वचषकासाठी निवडलेल्या संघात गोलंदाजाचा विचार करता तीन मुख्य वेगवान गोलंदाज तर पाच फिरकीपटू आहेत. पण विशेष म्हणजे यामध्ये भारताच टी-20 स्पेशलिस्ट फिरकीपटू युझवेंद्र चहलला संधी देण्यात आलेली नाही.

चहलला विश्वचषकासाठी संघात स्थान न मिळाल्याने पत्नी धनश्री भावूक, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना, म्हणाली...
युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा
| Edited By: | Updated on: Sep 10, 2021 | 6:28 PM
Share

मुंबई: बीसीसीआयने (BCCI) बुधवारी (8 सप्टेंबर) रात्री आगामी टी-20 वर्ल्ड कपसाठी (ICC T20 World Cup) संघाची घोषणा केली. यावेळी 15 मुख्य खेळाडूंसह 3 राखीव खेळाडूंची नावं जाहीर करण्यात आली. यामध्ये घेण्यात आलेल्या काही खेळाडूंच्या संघात असण्यावर जितकी चर्चा आहे तितकीच काही खेळाडूंना संधी न देण्यात आल्याने देखील आहे. यातीलच एक खेळाडू म्हणजे अनुभवी फिरकीपटू युझवेंद्र चहल (Yuzvendra chahal). दरम्यान चहलला संघात स्थान न मिळाल्यामुळे त्याची पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree verma) भावूक झाली असून तिने एक इन्स्टाग्राम स्टोरीतून आपल्या भावना मांडल्या.

धनश्रीने पोस्टमध्ये सरळ कोणाला उद्देशून काही लिहिलं नसलं तरी इशाऱ्यांमध्ये तिने चहलचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी ही पोस्ट केली आहे. तिने त्यात लिहिलं होतं की, ‘आई म्हणते ना… ही वेळही निघून जाईल. डोकं वर ठेवून जगा. चांगली कर्म आणि कौशल्य कधीच साथ सोडत नाही. तर गोष्ट अशी आहे की ही वेळही निघून जाईल.. देव फार महान आहे.’

Dhanshree verma post

धनश्री वर्माची इन्स्टाग्राम स्टोरी

चहलचा विरुद्ध चहर

संघात युझवेंद्र चहलच्या जागी राहुल चहरला स्थान देण्यात आलं असून यामागे दोघांची अलीकडील आयपीएलमधील कामगिरी हे सर्वात मोठं कारण असू शकतं. आरसीबी संघातील मुख्य फिरकीपटू चहल हा विकेट्स मिळवण्यात यशस्वी ठरतो. पण सोबतच त्याला भरपूर धावा ठोकल्या जातात. त्यातच मुंबई इंडियन्सचा राहुल चहर हा एक मुंबईकडून महत्त्वाच्या क्षणी विकेट तर घेतोच आहे. सोबतच अत्यंत कमी धावा ओव्हरमध्ये देण्यासाठी त्याला ओळखलं जात. दरम्यान या निवडीवर अनेकजण आपलं मत देत असून प्रसिद्ध क्रिकेट समालोचक हर्षा भोगले याने देखील चहलला न घेता राहुल चहरला संधी हे एक मोठं पाऊल असल्याचं म्हटलं आहे.

चहल एक यशस्वी टी-20 गोलंदाज

चहल आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये भारताचा प्रमुख गोलंदाज आहे. त्याने 49 सामन्यात 25.30 च्या सरासरीने  8.32 च्या इकानॉमी रेटने 63 विकेट्स घेतले आहेत. पण तरीही त्याला विश्वचषकासाठी संधी मिळालेली नाही. त्याच्या जागी संघात रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल आणि राहुल चाहर या फिरकीपटूंना संधी देण्यात आली आहे.

हे ही वाचा :

T20 world Cup 2021: भारतीय संघात 5 फिरकी गोलंदाज, इतके फिरकीपटू घेण्यामागे ‘हे’ आहे कारण

T 20 World Cup : टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा, अश्विनला संधी, शार्दूल ठाकूर रिजर्वमध्ये, धोनी मेंटरच्या भूमिकेत

गब्बरच्या आयुष्यातलं वादळ शमेना, पहिल्यांदा घटस्फोट आता BCCI कडून शिखर धवनला मोठा झटका

(Yuzvendra chahal wife dhanashree emotional after yuzvendra didnt selected for t20 world cup squad)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.