Video : पहिला तू..! इंग्लंडची तुतारी वाजवल्यानंतर अश्विन-कुलदीपमध्ये मानपान नाट्य, पाहा काय झालं ते

पाचव्या कसोटी सामन्यातील पहिला दिवस कुलदीप यादव आणि आर अश्विन यांनी गाजवला. या दोघांनी मिळून इंग्लंडचे 9 गडी बाद केले. तर एक विकेट रवींद्र जडेजाच्या वाटेला आली. डाव संपल्यानंतर मानापानावरून आर अश्विन आणि कुलदीप यादव यांच्या नाट्य रंगलं.

Video : पहिला तू..! इंग्लंडची तुतारी वाजवल्यानंतर अश्विन-कुलदीपमध्ये मानपान नाट्य, पाहा काय झालं ते
Follow us
| Updated on: Mar 07, 2024 | 5:45 PM

मुंबई : पाचव्या कसोटीचा पहिला दिवस भारताच्या नावावर राहिला. नाणेफेकीचा कौल गमवला तर पहिल्या दिवसावर भारताने मजबूत पकड मिळवली. पहिल्यांदा गोलंदाजांनी आणि त्यानंतर फलंदाजांनी पिसं काढली. एकंदरीत इंग्लंडच्या बेझबॉलची हवा गूल झाली असं म्हणायला हरकत नाही. बेझबॉल रणनिती इंग्लंडच्या धरतीवर पूरक असली तर भारतात ती रुजणार नाही हे स्पष्ट झालं आहे. दरम्यान इंग्लंडचा पहिला डाव 218 धावांवर आटोपला. आर अश्विन आणि कुलदीप यादवच्या फिरकीपुढे इंग्लंडच्या गोलंदाजांनी नांगी टाकली. या दोघांनी मिळून इंग्लंडच्या 9 फलंदाजांना तंबूत पाठवलं. तर एक विकेट काढण्यात रवींद्र जडेजाला यश आलं. कुलदीप यादवने 15 षटकांत 72 धावा देत 5 विकेट घेतल्या. तर रविचंद्रन अश्विनने 11.4 षटकात 51 धावा देत 4 बळी घेतले.

इंग्लंडचा डाव 218 धावांवर आटोपल्यानंतर सर्वोत्तम कामगिरी करणारा खेळाडू हातात चेंडू घेऊन अभिवादन करतो. पण धर्मशाळा कसोटीत अश्विन कुलदीप एकमेकांची मनधरणी करताना दिसले. पाच विकेट घेतल्याने कुलदीप यादवने अभिवादन करावं असं आर अश्विनला वाटत होतं. तर 100 वा कसोटी सामना असल्याने आर अश्विनने असं करावं असं कुलदीपचं म्हणणं होतं. त्यामुळे दोघंही एकमेकांकडे चेंडू देत होते. अखेर अश्विनने कुलदीपची समजूत काढली. सरते शेवटी कुलदीपने हातात चेंडू घेऊन चाहत्यांना अभिवादन केलं आणि ड्रेसिंग रुममध्ये गेला.

पहिल्या दिवसाचा खेळ संपला असून भारताने एक गडी बाद 135 धावा केल्या आहेत. यशस्वी जयस्वालने 58 चेंडूत 57 धावा केल्या. यात 5 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. शोएब बशीरच्या गोलंदाजीवर स्टंपिंग झाला. त्यानंतर रोहित शर्मा आणि शुबमन गिलने मोर्चा सांभाळला. रोहित शर्माने नाबाद 52 आणि शुबमन गिलने नाबाद 26 धावा केल्या आहेत.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, देवदत्त पडिक्कल, रवींद्र जडेजा, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेट), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, बेन स्टोक्स (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), टॉम हार्टले, शोएब बशीर, मार्क वुड, जेम्स अँडरसन

Non Stop LIVE Update
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.