Video : सरफराज खान ओरडून सांगत होता; पण रोहित शर्माने फिरवली पाठ, झालं 18 धावांचं नुकसान

पाचव्या कसोटीच्या पहिल्या दिवस भारतीय गोलंदाजांनी गाजवला. इंग्लंडची सुरुवात चांगली झाली पण भारतीय गोलंदाजांसमोर मधल्या फळीच्या फलंदाजांनी नांगी टाकली. टी ब्रेक पर्यंत इंग्लंडचा निम्म्याहून अधिक संघ तंबूत परतला होता. कदाचित या क्षणापर्यंत ऑलआऊटही झाला असता पण टीम इंडियाला एका विकेटचं नुकसान झालं.

Video : सरफराज खान ओरडून सांगत होता; पण रोहित शर्माने फिरवली पाठ, झालं 18 धावांचं नुकसान
Video : रोहित शर्माने सरफराज खानच्या सूचनेकडे केला कानाडोळा, बसला 18 धावांचा फटका
Follow us
| Updated on: Mar 07, 2024 | 2:53 PM

मुंबई : भारत इंग्लंड यांच्यात पाचवा कसोटी सामना धर्मशाळेत सुरु आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवसावर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी मजबूत पकड मिळवली. इंग्लंडची सुरुवात दमदार झाली होती. त्यामुळे हमखास 300 च्या पार धावा होतील असा अंदाज होता. 100 धावांवर अशी स्थिती होती, त्यामुळे क्रीडाप्रेमींना तसाच अंदाज होता. पण 8 विकेट्सवर 200 धावा अशी स्थिती आहे. कदाचित 200 धावांवर ऑलआऊटही झाला असता पण रोहित शर्माने सरफराज खानच्या सूचनेकडे कानाडोळा केला आणि एका विकेटचं नुकसान झालं. कुलदीप यादवने टीम इंडियाला पहिली विकेट मिळवून दिली. त्यानंतर त्याच्या गोलंदाजीवर आणखी दोन विकेट मिळाल्या आणि इंग्लंडचा संघ बॅकफूटवर गेला. चौथ्या विकेटसाठी जोरदार खटपट सुरु होती. कारण मधली फळी कमकुवत झाली की धावांचा वेग कमी होणार याचा अंदाज होता.

कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर सरफराज खानने चांगला झेल घेतला. यासाठी जोरदार अपीलही करण्यात आलं. पण पंचांनी नाबाद असल्याचं सांगून विकेट ढापली. सरफराज मात्र विकेटसाठी आग्रही होता आणि त्यासाठी त्याने कर्णधार रोहित शर्माकडे विनंतीही केली. मात्र रोहितने त्याचं काही ऐकलं नाही. डीआरएस रिव्ह्यू घेण्याचं टाळलं. पण जेव्हा एक्शन रिप्ले पाहिला गेलं तेव्हा बाद असल्याचं स्पष्ट झालं.

झॅक क्राउलेच्या बॅटला चेंडू घासला लेग साईडला आलेल्या ध्रुवच्या ग्लोव्हजला लागून वर उडाला. सरफराज खानने क्षणाचाही विलंब न करता उडी मारली आणि झेल घेतला. यानंतर सर्वांनी जोरदार अपील केलं. पंचांना नाबाद दिल्यानंतर ठरल्याप्रमाणे रोहितने विकेटकीपरचा कॉल घेतला. मात्र त्याने नकार दिल्याने माघारी परतला. पण सरफराज खान वारंवार बॅट लागल्याचं सांगत होता. पण रोहितने त्याचं काही ऐकलं नाही. तेव्हा क्राऊले 61 धावांवर होता.

झॅक क्राउलेला बाद करण्यात कुलदीपला यश आलं. मात्र त्याच्या धावसंख्येत 18 धावा जोडल्या गेल्यानंतर यश मिळालं. कुलदीपने त्याचा त्रिफळा उडवला. इंग्लंडकडून क्राउलेने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 108 चेंडूंचा सामना करत 79 धावा केल्या. यात 11 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता.

Non Stop LIVE Update
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.