IND vs ENG : पुण्यात चौथा टी 20 सामना , मॅच दुपारी की संध्याकाळी?

India vs England 3rd T20i Match Live Streaming : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथा सामना हा पुण्यात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये होणार आहे.

IND vs ENG : पुण्यात चौथा टी 20 सामना , मॅच दुपारी की संध्याकाळी?
Maharashtra Cricket Association Stadium Pune
Image Credit source: MCA X Account
| Updated on: Jan 30, 2025 | 7:57 AM

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात टी 20I मालिका खेळवण्यात येत आहे. एकूण 5 सामन्यांची ही मालिका आहे. दोन्ही संघांची ही या नववर्षातील पहिलीवहिली मालिका आहे. टीम इंडिया या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. इंग्लंडने सलग 2 सामने गमावल्यानंतर राजकोटमध्ये पलटवार केला आणि मालिकेत कमबॅक केलं. इंग्लंडने टीम इंडियाला पराभूत केलं आणि विजयाचं खातं उघडलं. टीम इंडियाचा हा या 2025 वर्षातील पहिलावहिला पराभव ठरला. आता उभयसंघातील चौथा सामना हा पुण्यात होणार आहे. या सामन्याला किती वाजता सुरुवात होणार? हे जाणून घेऊयात.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड चौथा टी 20I सामना केव्हा?

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड चौथा टी 20I सामना शुक्रवारी 31 जानवेारीला खेळवण्यात येणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड चौथा टी 20I सामना कुठे?

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड चौथा टी 20I सामना पुण्यात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये होणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड चौथ्या टी 20I सामन्याला किती वाजता सुरुवात होईल?

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड चौथ्या टी 20I सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होईल. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड चौथा टी 20I सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड चौथा टी 20I सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड चौथा टी 20I सामना मोबाईलवर कुठे बघता येईल?

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड चौथा टी 20I सामना मोबाईलवर डिज्ने+प्लस हॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.

इंग्लंडविरुद्धच्या टी 20i मालिकेसाठी भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अक्षर पटेल (उपकर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंह, नीतीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई आणि वॉशिंगटन सुंदर.

टी 20 सीरिजसाठी इंग्लंड टीम : जोस बटलर (कर्णधार) रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, गुस ऍटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, साकिब महमूद, फिल सॉल्ट आणि मार्क वुड.