AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NEP Probable Playing XI | नेपाळ विरुद्ध खेळणार ‘हे’ 11 प्लेयर, टीम इंडिया खेळणार जुनी चाल

India vs Nepal आशिया कप प्लेइंग XI | आशिया कपमध्ये भारताचा आज दुसरा सामना नेपाळ विरुद्ध आहे. पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध झाला होता. पावसाने या सामन्यावर पाणी फिरवलं. त्यामुळे आज दुसऱ्या सामन्याकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत.

IND vs NEP Probable Playing XI | नेपाळ विरुद्ध खेळणार 'हे' 11 प्लेयर, टीम इंडिया खेळणार जुनी चाल
Team IndiaImage Credit source: AFP
| Updated on: Sep 04, 2023 | 11:49 AM
Share

कँडी : पाकिस्तान विरुद्ध सामना रद्द झाला. आता नेपाळ विरुद्धच्या मॅचवर नजर आहे. आशिया कप 2023 मध्ये टीम इंडिया आपला दुसरा सामना नेपाळ विरुद्ध खेळणार आहे. वनडे क्रिकेटमध्ये दोन्ही टीममधील हा पहिला सामना आहे. अनुभवाच्या बाबतीत भारतासमोर नेपाळची टीम कुठेही टिकत नाही. म्हणजे टीम इंडियासाठी आव्हान जास्त कठीण नाहीय. पण टीम इंडिया विजय मिळवण्यात कुठलीही कसूर ठेवणार नाही. टीम इंडियाच्या पहिल्या सामन्यावर पावसाने पाणी फिरवलं. टीम इंडिया नेपाळ विरुद्ध कुठल्या प्लेइंग इलेव्हनसह खेळणार हा मुख्य मुद्दा आहे. पाकिस्तान विरुद्ध जी टीम होती, तीच प्लेइंग इलेव्हन कायम असेल का? किंवा काही बदल होतील का?

नेपाळ विरुद्धच्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल होणार नाही, अशी अपेक्षा आहे. पाकिस्तान विरुद्ध सर्व खेळाडूंना संधी मिळाली नाही. दुसऱ्याबाजूला टीम कॉम्बिनेशन बनलय, तर त्याला सेटल व्हायला सुद्धा थोडावेळ लागेल. अधिक सामने झाल्यानंतरच टीम कॉम्बिनेशन बनेल. नेपाळ विरुद्ध टीम इंडिया जुनी चाल खेळण्याची शक्यता आहे. जुनी चाल म्हणजे पाकिस्तान विरुद्ध जी रणनिती होती, तीच नेपाळ विरुद्ध असेल. आज नेपाळ विरुद्ध टीम इंडियात फक्त एक बदल होऊ शकतो. जसप्रीत बुमराह व्यक्तीगत कारणामुळे मुंबईला परतलाय. जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्मद शमीला संधी मिळू शकते. भारताची प्लेइंग इलेव्हन कशी असेल? ते एकदा जाणून घ्या.

नेपाळ विरुद्ध संभाव्य XI

रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, इशान किशन, विराट कोहली, हार्दिक पंड्या, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह/मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव. आजच्या सामन्यावर पावसाचे सावट का?

भारत आणि नेपाळमध्ये सामना पल्लेकेलेमध्ये होणार आहे. म्हणजे भारत-पाकिस्तानमध्ये सामना इथेच झाला होता. त्यावेळी पावसामुळे सामना रद्द झाला होता. नेपाळ विरुद्ध सामन्यातही तीच स्थिती आहे. पावसाची शक्यता आहे. वर्ल्ड कप 2023 आधी टीम इंडियाच्या दृष्टीने ही महत्त्वाची स्पर्धा आहे.

Follow Us
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय...
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय चर्चांना उधाण
विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
Praful Patel | विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... शेतकरी संतप्त
Viral Video : माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... संतप्त शेतकऱ्याचं सरकारला आव्हान
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस...अहिल्यानगरच्या शेवगाव...
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस... अहिल्यानगरच्या शेवगावात नेमकं काय घडलं?
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह...
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह दिग्गजांच्या नावांची पडताळणी, नेमकं प्रकरण काय?
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची जैन...
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची निलेशचंद्र मुनींशी भेट
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक...
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक... व्हिडीओ व्हयरल
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी...अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत...
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी... अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत गोगावलेंचा थेट पलटवार
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा, थेट...
हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर,
मोठी बातमी! हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर, पक्ष सोडण्याआधीच म्हणाले...