IND vs NEP : पदार्पणाच्या सामन्यात राष्ट्रगीतावेळी साई किशोर याला अश्रू अनावर, दिनेश कार्तिकने दिली मनं जिंकणारी प्रतिक्रिया

Asian Games 2023, IND vs NEP : एशियन गेम्स 2023 पुरुष क्रिकेट स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीचा सामना भारत आणि नेपाळ यांच्यात रंगला. हा सामना भारताने 23 धावांनी जिंकला. पण या सामन्यात साई किशोर हा चर्चेत राहिला. राष्ट्रगीतावेळी त्याला अश्रू अनावर झाले.

IND vs NEP : पदार्पणाच्या सामन्यात राष्ट्रगीतावेळी साई किशोर याला अश्रू अनावर, दिनेश कार्तिकने दिली मनं जिंकणारी प्रतिक्रिया
IND vs NEP : डेब्यू सामन्यात राष्ट्रगीतावेळी साई किशोर याच्या अश्रूंचा बांध फुटला, दिनेश कार्तिक म्हणाला...
| Updated on: Oct 03, 2023 | 3:34 PM

मुंबई : एशियन गेम्स 2023 स्पर्धेत भारताने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात नेपाळचा 23 धावांनी पराभव केला. या सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यशस्वी जैस्वालच्या शतकी खेळीमुळे भारताने नेपाळसमोर विजयासाठी 202 धावां आव्हान दिलं होतं. यशस्वी जैस्वाल याने 49 चेंडूत 8 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 100 धावा केल्या. विजयी धावांचा पाठलाग करताना नेपाळच्या संघना 9 गडी गमवून 178 धावा केल्या. या सामन्यात साई किशोर याने भारतासाठी टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. साई किशोर देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत आहे. त्या कामगिरीच्या जोरावरच त्याने संघात स्थान मिळवलं आहे. त्याची प्लेइंग 11 मध्ये वर्णी लागली आणि राष्ट्रगीतावेळी त्याला भावना अनावर झाल्या आणि अश्रूंचा बांध फुटला.

साई किशोरवर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

नाणेफेकीचा कौल झाला आणि भारताने फलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी दोन्ही संघाचे खेळाडू राष्ट्रगीतासाठी उभे राहिले. राष्ट्रगीत सुरु झालं तेव्हा साई किशोर भावुक झाला आणि अश्रू अनावर झाले. साईचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओखाली लोकं त्याचं कौतुक करत आहे. यात दिनेश कार्तिक यानेही आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. कार्तिकने हा व्हिडीओ रिट्वीट करत लिहिलं आहे की हा खेळाडू कायम माझ्या यादीत अव्वल स्थानी होता.

काय म्हणाला दिनेश कार्तिक?

दिनेश कार्तिक याने आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, ‘जे लोकं कठोर परिश्रम करतात देव त्यांना त्याच पद्धतीने परत देतो. हा खेळाडू खरंच ग्रेट आहे. त्याने देशांतर्गत व्हाइट क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. हा खेळाडू सुपरस्टार आहे आणि यासाठी मी खूप खूश आहे.’ त्यानंतर दिनेश कार्तिक लिहिलं की, ‘आज सकाळी जेव्हा उठलो तेव्हा प्लेइंग 11 मध्ये त्याचं नाव पाहून मीच भावुक झालो. आपल्याला काही चांगलं करावी ही इच्छा असते. तो कायम माझ्या यादीत शीर्षस्थानी होता.’

साई किशोरला नेपाळ विरुद्धच्या सामन्यात फलंदाजीची संधी मिळाली नाही. पण त्याने 4 षटकात 25 धावा देत 1 गडी बाद केला. साई किशोरने आघाडीचा फलंदाज कुशल भुर्तेल याला बाद केलं. आयपीएलमध्ये साई किशोर गुजरात टायटन्सकडून खेळतो. तर फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये तामिळनाडूकडून खेळतो.