AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ODI World Cup 2023 : आयसीसीच्या तीन नव्या नियमांमुळे स्पर्धा होणार आणखी रंगतदार, काय केलं ते वाचा

ODI World Cup 2023 : वनडे वर्ल्डकप स्पर्धेचं 13 वं पर्व आहे. या पर्वात दहा संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहे. पहिल्यांदाच रॉबिन राउंड पद्धतीने सामने होणार आहे. दुसरीकडे, आयसीसीने तीन नवे नियम आणल्याने स्पर्धेची रंगत वाढणार आहे.

ODI World Cup 2023 : आयसीसीच्या तीन नव्या नियमांमुळे स्पर्धा होणार आणखी रंगतदार, काय केलं ते वाचा
ODI World Cup 2023 : वनडे वर्ल्डकप स्पर्धेची रंगत आणखी वाढणार, आयसीसीच्या तीन नव्या नियमांची भर
| Updated on: Oct 03, 2023 | 2:42 PM
Share

मुंबई : क्रिकेट महाकुंभाची सुरुवात 5 ऑक्टोबरपासून आहे. क्रीडाप्रेमी गेल्या अनेक दिवसांपासून या दिवसाची वाट पाहात होते. आता वनडे वर्ल्डकप स्पर्धा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली आहे. अशात आयसीसीच्या नव्या नियमांची जोरदार चर्चा रंगली आहे. यामुळे स्पर्धेची रंगत आणखी वाढणार आहे. 2019 मध्ये एका नियमामुळे जोरदार वाद झाला होता. हा नियमात देखील आयसीसीने बदल केला आहे. 2019 वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड असा सामना झाला होता. मात्र हा सामना बरोबरीत सुटल्याने सुपर ओव्हरमध्ये खेळला गेला. तिथेही बरोबरी साधली गेली. मात्र इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आलं. त्यामुळे बराच वाद रंगला होता. अखेर आयसीसीने या नियमात बदल केला आहे.

कोणते तीन नियम नव्याने लागू केले ते जाणून घ्या

  • 2019 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत चौकारांच्या आधारावर इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आलं होता. त्यामुळे सोशल मीडियावर बराच वाद रंगला होता. सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर होते. त्यातही बरोबरी झाली तर चौकारांच्या आधारावर विजेता घोषित केला जातो. याच नियमामुळे इंग्लंडला जेतेपद मिळालं होतं. मात्र हा नियम बदलला असून आता विजयी निकाल येईपर्यंत सुपर ओव्हर खेळली जाणार आहे.
  • मैदानावरील पंचांचा सॉफ्ट सिग्नल संपुष्टात आला आहे. मैदानातील पंचाना तिसऱ्या पंचांना विचारण्यापूर्वी आधी त्यांचा निर्णय द्यावा लागत होता. त्यामुळे तिसऱ्या पंचांचा निर्णय कधी कधी जवळपास असला तरी मैदानातील पंचाच्या बाजूने जायचा. आऊट असो की नसो मैदानातील पंचांच्या पक्षात निर्णय घेतला जायचा. पण आता हा सॉफ्ट सिग्नल नियम संपुष्टात आला आहे. जर तिसरा पंच बाद की नाबाद ठरवण्यात अपयशी ठरला तरच मैदानातील पंचांचा निर्णय अंतिम मानला जाईल.
  • वनडे वर्ल्डकप स्पर्धेसाठी आयसीसीने आणखी एक नियम जोडला आहे. स्पर्धेतील एकाही स्टेडियमची बाउंड्री 70 मीटरपेक्षा कमी नसेल. काही ठिकाणी सीमारेषा जवळ असल्याने फलंदाज आरामात चौकार आणि षटकारांचा वर्षाव करतो. हे लक्षात घेऊनच हा नियम तयार केला आहे.

भारताचा सामना पहिला सामना कधी?

वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. 8 ऑक्टोबरला हा सामना होणार आहे. त्यानंतर 11 ऑक्टोबरला अफगाणिस्तान आणि 14 ऑक्टोबरला पाकिस्तानसोबत सामना होईल. भारताला उपांत्य फेरी सहजरित्या गाठण्यासाठी काहीही करून 7 सामने जिंकावे लागणार आहेत.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा