IND vs NZ : डॅरेल मिचेल-ग्लेन फिलीप्सचा शतकी तडाखा, भारतासमोर फायनलमध्ये 338 रन्सचं टार्गेट, कोण जिंकणार मालिका?

Daryl Mitchell and Glenn Phillips Century IND vs NZ 3rd Odi : डॅरेल मिचेल भारतावर पु्न्हा एकदा भारी पडलाय. डॅरेलने भारताविरुद्ध तिसऱ्या सामन्यात शतक ठोकलं. तसेच ग्लेन फिलिप्सनेही शतक झळकावलं. त्यामुळे न्यूझीलंडला 320 पार मजल मारता आली.

IND vs NZ : डॅरेल मिचेल-ग्लेन फिलीप्सचा शतकी तडाखा, भारतासमोर फायनलमध्ये 338 रन्सचं टार्गेट, कोण जिंकणार मालिका?
Daryl Mitchell and Glenn Phillips Century
Image Credit source: Icc X account
| Updated on: Jan 18, 2026 | 6:09 PM

डॅरेल मिचेल आणि ग्लेन फिलिप्स या मधल्या फळीतील फलंदाजांनी केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये आयोजित तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात भारतासमोर 338 धावांचं आव्हान ठेवलं आहे. न्यूझीलंडने 50 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 337 धावा केल्या. डॅरेल मिचेल आणि ग्लेन फिलिप्स या जोडीने चौथ्या विकेटसाठी केलेल्या द्विशतकी भागीदारीच्या जोरावर न्यूझीलंडला हा धावांचा डोंगर उभारता आला. उभयसंघातील ही मालिका1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे आता टीम इंडिया विजयी धावा पूर्ण करुन मालिका नावावर करणार की पाहुणे यजमानांचा धुव्वा उडवत इतिहास घडवणार? हे थोड्याच वेळात निकालानंतर स्पष्ट होईल.

कर्णधार शुबमन गिल याने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला बॅटिंगसाठी भाग पाडलं. भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडला झटपट 2 झटके देत चांगली सुरुवात केली. अर्शदीप सिंह याने न्यूझीलंडच्या डावातील पहिल्याच ओव्हरमधील चौथ्या बॉलवर हेन्री निकोल्स याला झिरोवर आऊट केलं. अर्शदीपने निकोल्सला बोल्ड केलं. त्यानंतर हर्षित राणा याने सामन्यातील दुसऱ्या आणि आपल्या कोट्यातील पहिल्याच ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर डेव्हॉन कॉनव्हे याला रोहित शर्मा याच्या हाती 5 धावावंर आऊट केलं. त्यामुळे न्यूझीलंडची 2 आऊट 5 अशी स्थिती झाली. त्यानंतर डॅरेल मिचेल आणि विल यंग या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 66 बॉलमध्ये 53 रन्सची पार्टनरशीप केली. त्यानंतर यंग आऊट झाला. यंगने 30 धावा केल्या.

चौथ्या विकेटसाठी द्विशतकी भागीदारी

त्यानंतर डॅरेल मिचेल आणि विल यंग या दोघांनी न्यूझीलंडला सावरत भक्कम स्थितीत आणून ठेवलं.  डॅरेल मिचेल आणि विल यंग  या जोडीने इतिहास घडवला. या जोडीने चौथ्या विकेटसाठी विक्रमी आणि द्विशतकी भागीदारी केली. मिचेल आणि यंगने 186 चेंडूत 219 धावांची भागीदारी केली. या दरम्यान दोघांनी वैयक्तिक शतकं झळकावली. मात्र त्यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी जोरदार कमबॅक करत न्यूझीलंडला आणखी काही धावा जोडण्यापासून रोखलं. भारताने न्यूझीलंडला 50 धावांच्या मोबदल्यात 5 झटके दिले. त्यामुळे न्यूझीलंडची स्थिती 3 आऊट 277 वरुन 8 आऊट 327 अशी झाली.

डॅरेल मिचेलचा शतकी तडाखा

न्यूझीलंडसाठी डॅरेल मिचेल याने सर्वाधिक धावा केल्या. मिचेलने 131 चेंडूत 3 षटकार आणि 15 चौकारांच्या मदतीने 137 धावा केल्या. तर ग्लेन फिलिप्स याने 88 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 9 फोरसह 106 रन्स केल्या. कॅप्टन मायकल ब्रेसवेल याने नाबाद 28 धावांचं योगदान दिलं. तर टीम इंडियाकडून हर्षित राणा आणि अर्शदीप सिंह या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स मिळवल्या. तर मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

भारतीय संघ इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये अजिंक्य आहे. भारताने  या मैदानात एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकही सामना गमावलेला नाही.  त्यामुळे आता टीम इंडिया या मैदानातील आपला विक्रम कायम ठेवत मालिका जिंकणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.