AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ 3rd ODI: संजू सॅमसनला का खेळवत नाही? काँग्रेस नेत्याने विचारला प्रश्न

IND vs NZ 3rd ODI: ऋषभ पंतला खेळवता, संजूला का नाही? सॅमसनला बाहेर बसवणं बनला राजकीय मुद्दा....

IND vs NZ 3rd ODI: संजू सॅमसनला का खेळवत नाही? काँग्रेस नेत्याने विचारला प्रश्न
Rishabh pant Image Credit source: AFP
| Updated on: Nov 30, 2022 | 1:43 PM
Share

तिरुअनंतपूरम: न्यूझीलंड टूरवर ऋषभ पंत पुन्हा एकदा अपयशी ठरला आहे. फक्त 25 धावांसह ऋषभ पंतसाठी न्यूझीलंड दौरा आटोपला. ख्राइस्टचर्चमध्ये त्याच्याकडून भरपूर अपेक्षा होत्या. ऋषभकडे आरामात खेळण्याची संधी होती. तो 13 व्या ओव्हरमध्ये क्रीजवर उतरला होता. विकेटवर स्थिरस्थावर होण्यासाठी त्याच्याकडे पुरेसा वेळ होता. पण त्याला या संधीचा फायदा उचलता आला नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फक्त 11.1 ओव्हर गोलंदाजीचा अनुभव असलेल्या बॉलरने त्याची विकेट काढली.

2 इनिंगमध्ये फक्त 25 धावा

ऋषभ पंतला डॅरिल मिचेलने ग्लेन फिलिप्सकरवी झेलबाद केलं. या दरम्यान त्याने 16 चेंडूत फक्त 10 धावा केल्या. 3 वनडे सामन्याच्या सीरीजमध्ये 2 इनिंगमध्ये त्याने फक्त 25 धावा केल्या. याआधी नेपियर वनडेत पंतने फक्त 15 धावा केल्या होत्या.

नंबर 4 वरही पंत फेल

ऋषभ पंतच्या कामगिरीत सातत्याने घसरण होतेय. त्यामुळेच त्याच्या फॉर्मवर सातत्याने प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातय. त्याला बॅटिंगची पुरेशी संधी मिळावी, म्हणून ख्राइस्टचर्चमध्ये त्याला प्रमोट करुन चौथ्या नंबरवर संधी दिली होती. पण फलंदाजीत काही बदल झाला नाही. या मॅचआधी कोच व्ही.व्ही.एस लक्ष्मण म्हणाले होते की, “त्याने नंबर 4 वर चांगल परफॉर्म केलय. त्याला पूर्ण टीम सपोर्ट करेल”

ते काँग्रेस नेते कोण?

आजच्या सामन्यासाठी प्लेइंग 11 निवडण्यात आली. त्यावेळी काँग्रेस नेते शशी थरुर यांनी ऋषभच्या फलंदाजीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं. संजू सॅमसनची निवड केली नाही, म्हणून निशाणा साधला होता.

“ऋषभ पंत चांगला खेळाडू आहे. पण मागच्या 11पैकी 10 इनिंगमध्ये तो अपयशी ठरलाय. तेच संजू सॅमसनची मागच्या 5 इनिंगमध्ये 66 ची सरासरी आहे. मागच्या 5 इनिंगमध्ये धावा बनूवनही तो बेंचवर बसलाय. ही गोष्ट गांभीर्याने घेण्याची गरज आहे” असं थरुर यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलय.

असं खेळूनही पंत टीममध्ये

यावर्षात वनडे क्रिकेटमध्ये ऋषभच्या नावावर 10 डावात एक शतक आणि दोन अर्धशतकं आहेत. दोनवेळा तो शुन्यावर आऊट झालाय. 5 वेळा 20 पेक्षा जास्त धावा केलेल्या नाहीत. त्याच्या बॅटिंग सरासरीमध्ये सुद्धा मागच्यावर्षीच्या तुलनेत घसरण झालीय.

आम्ही चहापाण्याला कशासाठी जायचं? भास्कर जाधव आक्रमक
आम्ही चहापाण्याला कशासाठी जायचं? भास्कर जाधव आक्रमक.
लाडकी बहिणीच्या सुरक्षितेकडे सरकारचं दुर्लक्ष; वडेट्टीवारांची टीका
लाडकी बहिणीच्या सुरक्षितेकडे सरकारचं दुर्लक्ष; वडेट्टीवारांची टीका.
तपोवन सुंदर आहे...फक्त 'हे' बोलले पाहिजेत
तपोवन सुंदर आहे...फक्त 'हे' बोलले पाहिजेत.
शेतकऱ्यांना तारीख पे तारीख! विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल
शेतकऱ्यांना तारीख पे तारीख! विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल.
शिंदे, दादांचा मालक एकच! उद्धव ठाकरेंची शिंदेसेनेवर खोचक टीका
शिंदे, दादांचा मालक एकच! उद्धव ठाकरेंची शिंदेसेनेवर खोचक टीका.
मुंबई महापौरपदावरून भाजप-शिंदे सेना आमने-सामने; लोढांच्या दाव्याने वाद
मुंबई महापौरपदावरून भाजप-शिंदे सेना आमने-सामने; लोढांच्या दाव्याने वाद.
फडणवीसांचा मी लाडका मंत्री, त्यामुळे... ; नितेश राणे यांचं मोठं विधान
फडणवीसांचा मी लाडका मंत्री, त्यामुळे... ; नितेश राणे यांचं मोठं विधान.
टोमणे मारणे हाच उद्योग राहिलाय! शिरसाट यांचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर
टोमणे मारणे हाच उद्योग राहिलाय! शिरसाट यांचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर.
सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडले राईट टू डिस्कनेक्ट विधेयक
सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडले राईट टू डिस्कनेक्ट विधेयक.
रुपाली पाटील पक्ष सोडणार? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद
रुपाली पाटील पक्ष सोडणार? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद.