IND vs NZ Final आधी पिचबाबत मोठी अपडेट, विराट कोहलीसाठी गूड न्यूज!

India vs New Zealand Champions Trophy 2025 Final : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील अंतिम सामना कोणत्या खेळपट्टीवर होणार? याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

IND vs NZ Final आधी पिचबाबत मोठी अपडेट, विराट कोहलीसाठी गूड न्यूज!
india vs new zealand ct 2025 dubai
Image Credit source: Christophe Viseux-ICC/ICC via Getty Images
| Updated on: Mar 07, 2025 | 10:36 PM

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 फायनलमध्ये ए ग्रुपमधील टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड आमनेसामने असणार आहेत. हा सामना रविवारी 9 मार्चला दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. या महामुकाबल्याकडे साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून आहे. दोन्ही संघ चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये 2000 नंतर पुन्हा एकदा दोन हात करणार आहेत. हा महामुकाबला दुबई स्टेडियममध्ये कोणत्या पिचवर खेळवला जाणार? याबाबत अपडेट समोर आली आहे. ही खेळपट्टी कुणासाठी फायदेशीर ठरणार? हे आपण सविस्तर जाणून घेऊयात.

महाअंतिम सामना कोणत्या खेळपट्टीवर?

दुबईत होणारा महाअंतिम सामना हा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील आणि टीम इंडियाचा एकूण पाचवा सामना असणार आहे. तर न्यूझीलंडचा दुसरा सामना असणार आहे. याआधी टीम इंडिया-न्यूझीलंड दोन्ही संघ 2 मार्चला याच मैदानात आमनेसामने आले होते. उभयसंघातील सामना हा नव्या-कोऱ्या खेळपट्टीवर खेळवण्यात आला होता. मात्र अंतिम सामना कोणत्या खेळपट्टीवर होणार? जाणून घेऊयात.

टीओयच्या वृत्तानुसार, भारत-न्यूझीलंड महामुकाबला सामना हा याआधी वापरण्यात आलेल्या खेळपट्टीवरच खेळवला जाणार आहे. टीम इंडियाने याआधीचे 4 सामने या स्टेडियममधील वेगवेगळ्या पिचवर खेळले होते. या चारही खेळपट्टींवर फिरकी गोलंदाजांना मदत झाली होती. तसेच 4 पैकी एका खेळपट्टीकडून फलंदाजांनाही मदत झाली होती. याच खेळपट्टीवर हा अंतिम सामना होणार आहे.

रिपोर्ट्सनुसार, भारत-पाकिस्तान सामना ज्या खेळपट्टीवर झाला त्याच पीचवर हा महामुकाबला खेळवण्यात येणार आहे.
टीम इंडिया-पाकिस्तान यांच्यात 23 फेब्रुवारीला सामना झाला होता. भारताने हा सामना 4 विकेट्सने जिंकला होता. विराटने या सामन्यात शतकी खेळी करत टम इंडियाला विजयी केलं होतं. त्यामुळेच जर अंतिम सामना हा त्याच खेळपट्टीवर झाला तर विराटसाठी ही निश्चित आनंदाची बातमी ठरेल.

पीच फायनल!

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती आणि अर्शदीप सिंग.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी न्यूझीलंड टीम : मिचेल सँटनर (कर्णधार), विल यंग, ​​डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, रचिन रवींद्र, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मॅट हेन्री, कायल जेमिसन, विल्यम ओरुर्के, डॅरिल मिशेल, नॅथन स्मिथ, मार्क चॅपमन आणि जेकब डफी.