IND vs NZ Final : इंडिया-न्यूझीलंड चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलआधी टीमला झटका, गेमचेंजर खेळाडू आऊट!
India vs New Zealand Icc Champions Trophy 2025 Final : दुखापतीमुळे स्टार आणि गेमचेंजर खेळाडूला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलला मुकावं लागू शकतं. जाणून घ्या मुख्य प्रशिक्षकांनी काय माहिती दिली?

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील अंतिम सामन्यात टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये आमनेसामने असणार आहेत. रविवारी 9 मार्चला होणाऱ्या या सामन्याकडे साऱ्यांचं लक्ष लागून आहे. आयसीसीने या सामन्यासाठी पंचांसह सामनाधिकाऱ्यांच्या नावाची घोषणा केली आहे. मात्र अंतिम सामन्याआधी टीमला झटका देणारी बातमी समोर आली आहे. स्टार गोलंदाजाला दुखापीतमुळे अंतिम सामन्याला मुकावं लागू शकतं. त्यामुळे टीमचं टेन्शन वाढलं आहे.
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेनरी याला खांद्याच्या दुखापतीमुळे फायनलमधून बाहेर व्हावं लागू शकतं. मॅटला दुखापतीमुळे हा सामना खेळता आला नाही, तर न्यूझीलंडसाठी हा सर्वात मोठ झटका असेल. तर दुसर्या बाजूला टीम इंडियासाठी हा दिलासा असेल. मॅटने या स्पर्धेतील साखळी फेरीत टीम इंडियाविरुद्ध 5 विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे मॅट या बाहेर झाला तर टीम इंडियासाठी गूड न्यूज असेल.
मॅटने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. तसेच मॅटने टीम इंडियाविरुद्धही प्रभावी कामगिरी केली आहे. मॅटने या स्पर्धेत साखळीतील 3 आणि उपांत्य अशा एकूण 4 सामन्यांमध्ये 10 विकेट्स घेतल्या आहेत. मॅटने त्यापैकी 5 विकेट्स या भारताविरुद्ध 2 मार्चला झालेल्या सामन्यात घेतल्या होत्या.
हेड कोचकडून दुखापतीबाबत अपडेट
मॅटला खांद्याला दुखापत झाली आहे. मॅटला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उपांत्य फेरीतील सामन्यात झेल घेताना ही दुखापत झाली. मॅटला यानंतर मैदानाबाहेर जावं लागलं होतं. मॅटच्या या दुखापतीबाबत न्यूझीलंडचे हेड कोच गेरी स्टेड यांनी अपडेट दिली आहे. “मॅट अंतिम सामन्यात खेळणार की नाही? याबाबत काहीच निश्चित नाही. मात्र आम्ही स्टेड अंतिम सामन्यात खेळण्यासाठी फिट व्हावा, यासाठी शक्य ते प्रयत्न करत आहोत. खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे मॅटला वेदना होत आहेत. मॅटला फायनलआधी फिट होईल, अशी आम्हाला आशा आहे”, असं स्टेड म्हणाले.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती आणि अर्शदीप सिंग.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी न्यूझीलंड टीम : मिचेल सँटनर (कर्णधार), विल यंग, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, रचिन रवींद्र, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मॅट हेन्री, कायल जेमिसन, विल्यम ओरुर्के, डॅरिल मिशेल, नॅथन स्मिथ, मार्क चॅपमन आणि जेकब डफी.
