IND vs NZ, 2nd odi : टीम इंडिया न्यूझीलंड दुसऱ्या सामन्याचा विजेता दुपारी 1 वाजता ठरणार! कसं काय?
India vs New Zealand 2nd Odi : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना दोन्ही संघांसाठी निर्णायक असा आहे. भारत या मालिकेत आघाडीवर आहे. तर न्यूझीलंसाठी हा सामना करो या मरो असा आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा आणि निर्णायक एकदिवसीय सामना हा बुधवारी 14 जानेवारीला राजकोटमधील निरंजन शाह स्टेडियममध्ये होणार आहे.टीम इंडिया या 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे भारताला राजकोटमध्ये विजय मिळवून मालिका नावावर करण्याची मोठी संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला न्यूझीलंडला मालिकेतील आव्हान कायम राखायचं असेल तर कोणत्याही स्थितीत राजकोटमध्ये सामना जिंकावा लागणार आहे.त्यामुळे मालिकेतील या दुसऱ्या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना चढाओढ पाहायला मिळण्याची अधिक शक्यता आहे. मात्र हा सामना कोण जिंकणार हे दुपारी 1 वाजताच जवळपास स्पष्ट होईल. हे असं आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. नक्की आकडे काय सांगतात? हे सविस्तर जाणून घेऊयात.
