AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ : भारत-न्यूझीलंड दुसऱ्या सामन्याच्या वेळेत बदल? किती वाजता सुरुवात होणार?

India vs New Zealand 2nd Odi Live Streaming : भारत विरुद्ध न्यूझीलंड दोन्ही संघांत मकरसंक्रांतीला दुसरा एकदिवसीय सामना होणार आहे. टीम इंडिया सलग दुसरा सामना जिंकून संक्रांत गोड करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

IND vs NZ : भारत-न्यूझीलंड दुसऱ्या सामन्याच्या वेळेत बदल? किती वाजता सुरुवात होणार?
IND vs NZ 2nd Odi Live StreamingImage Credit source: Bcci
| Updated on: Jan 13, 2026 | 10:43 PM
Share

न्यूझीलंड विरुद्ध नववर्षात विजयी सुरुवात केल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी सज्ज झाला आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात 3 सामन्यांची मालिका खेळण्यात येत आहे. या मालिकेत भारतीय संघ 1-0 ने पुढे आहे. भारताने 11 जानेवारीला न्यूझीलंडवर सहज विजय मिळवला. त्यानंतर आता चाहत्यांना दुसर्‍या सामन्याची प्रतिक्षा आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा या अनुभवी जोडीने भारताला पहिल्या सामन्यात विजयी करण्यात योगदान दिलं होतं. मात्र विराटचं शतक 7 धावांनी हुकलं. तर रोहितला 26 धावा करुन मैदानाबाहेर जावं लागलं होतं. त्यामुळे भारतीय चाहत्यांना दुसर्‍या सामन्यात रोहित आणि विराटकडून मोठ्या वादळी खेळीची आशा असणार आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना कुठे आणि कधी पाहता येणार? हे जाणून घेऊयात.

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड दुसरा एकदिवसीय सामना कधी?

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड दुसरा एकदिवसीय सामना बुधवारी 14 जानेवारीला खेळवण्यात येणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड दुसरा एकदिवसीय सामना कुठे?

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड दुसरा एकदिवसीय सामना राजकोटमधील निरंजन शाह स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या एकदिवसीय सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या एकदिवसीय सामन्याच्या वेळेत कोणताही बदल करणयात आलेला नाही. दुसऱ्या सामन्याला नियोजित वेळेनुसार दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर त्याआधी 1 वाजता टॉस होईल.

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड दुसरा एकदिवसीय सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळणार?

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड दुसरा एकदिवसीय सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड दुसरा एकदिवसीय सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळणार?

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड दुसरा एकदिवसीय सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह पाहता येईल.

भारताच्या संघात 2 बदल

दरम्यान न्यूझीलंड विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी आतापर्यंत भारतीय संघात 2 बदल करण्यात आले आहेत. टीम मॅनेजमेंटला हे दोन्ही बदल नाईलाजाने करावे लागले आहेत. विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंत याला पहिल्या सामन्याआधी दुखापत झाली. त्यामुळे पंतला संपूर्ण मालिकेतून बाहेर व्हावं लागलं. पंतच्या जागी ध्रुव जुरेल याचा समावेश करण्यात आला. त्यानंतर ऑलराउंडर वॉशिंग्टन सुंदर याला पहिल्या सामन्यात बॉलिंग करताना झालेल्या दुखापतीमुळे उर्वरित मालिकेतून माघार घ्यावी लागली. सुंदरच्या जागी युवा आयुष बडोनी याचा समावेश करण्यात आला.

सत्ता असताना नाशिकसाठी काय केलं?, अविनाश जाधवांचा फडणवीसांना सवाल
सत्ता असताना नाशिकसाठी काय केलं?, अविनाश जाधवांचा फडणवीसांना सवाल.
2 पक्ष नाही तर 2 परिवार एकत्र आले, अमित ठाकरे
2 पक्ष नाही तर 2 परिवार एकत्र आले, अमित ठाकरे.
50 टक्क्यांचा आत आरक्षण असलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका!
50 टक्क्यांचा आत आरक्षण असलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका!.
जिल्हा परिषद निवडणुका कधी? निवडणूक आयोगाकडून तारीख जाहीर
जिल्हा परिषद निवडणुका कधी? निवडणूक आयोगाकडून तारीख जाहीर.
अदानी 10 वर्षांत एवढे मोठे कसे झाले?, ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल
अदानी 10 वर्षांत एवढे मोठे कसे झाले?, ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल.
जागे रहा! ... तर कानाखाली वाजवा! उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
जागे रहा! ... तर कानाखाली वाजवा! उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
12 जिल्हा परिषद, 125 पंचायत समित्यांसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित
12 जिल्हा परिषद, 125 पंचायत समित्यांसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित.
अर्लामवाल्याचं घड्याळ बंद करुन...; भाषणातून फडणवीसांची टोलेबाजी
अर्लामवाल्याचं घड्याळ बंद करुन...; भाषणातून फडणवीसांची टोलेबाजी.
धर्माच्या नावावर लढत आहेत; नितेश राणेंची विरोधकांवर टीका
धर्माच्या नावावर लढत आहेत; नितेश राणेंची विरोधकांवर टीका.
हिंदी सक्तीचा मुद्दा पुन्हा पेटला, मनसे आक्रमक, भाजपला गंभीर इशारा
हिंदी सक्तीचा मुद्दा पुन्हा पेटला, मनसे आक्रमक, भाजपला गंभीर इशारा.