IND vs NZ Playing XI: ‘त्या’ दोघांना संधी मिळणं कठीण, न्यूझीलंड विरुद्ध अशी असेल Playing 11

| Updated on: Nov 24, 2022 | 5:58 PM

IND vs NZ Playing XI: न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या वनडेसाठी कशी असेल टॉप ऑर्डर, मिडल ऑर्डर, गोलंदाजी जाणून घ्या.....

IND vs NZ Playing XI: त्या दोघांना संधी मिळणं कठीण, न्यूझीलंड विरुद्ध अशी असेल Playing 11
Team india
Follow us on

ऑकलंड: न्यूझीलंडला टी 20 सीरीजमध्ये 1-0 ने हरवल्यानंतर आता वनडे सीरीजच आव्हान आहे. तीन सामन्यांच्या वनडे सीरीजची सुरुवात शुक्रवारपासून ऑकलंडमध्ये होत आहे. सीरीज सुरु होण्याआधी एक मोठा प्रश्न आहे, टीम इंडियाची प्लेइंग 11 काय असेल?. टी 20 सीरीजमध्ये संजू सॅमसन, उमरान मलिक सारख्या खेळाडूंना संधी मिळाली नाही. आता वनडे सीरीजमध्ये काही बदलेलं का?

टी 20 सीरीजच्यावेळी कॅप्टन हार्दिक पंड्याने सांगितल होतं की, रणनीतिक कारणांमुळे संजू सॅमसनला संधी देऊ शकलो नाही. आता तो वनडेच्या रणनीतिमध्ये फिट बसतो का?

संजू सॅमसन आणि उमरान मलिक सारख्या खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण सोपं नाहीय. भारतीय स्क्वाडमध्ये अशी नाव आहेत, ज्यांना बाहेर ठेवणं इतकं सोपं नाहीय.

त्या दोघांना संधी मिळणं कठीण

संजू सॅमसन आणि उमरान मलिकला संधी मिळण कठीण दिसतय. ऋषभ पंतच्या रुपाने एक विकेटकीपर आहे. दीपक हुड्डा सुद्धा या टीममध्ये आहे. तो एक ऑलराऊंडर आहे. उमरान मलिकला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. कारण स्क्वाडमध्ये दीपक चाहर, शार्दुल ठाकूर सारखे गोलंदाज आहेत. टी 20 फॉर्मेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या अर्शदीप सिंहला डेब्युची संधी मिळू शकते.

प्लेइंग इलेव्हनमध्ये टॉप 6 कोण?

शिखर धवन आणि शुभमन गिल ओपनर म्हणून येतील. श्रेयस अय्यरने मागच्या न्यूझीलंड सीरीजमध्ये चांगलं प्रदर्शन केलं होतं. त्यामुळे त्याचं स्थान पक्क आहे. सूर्यकुमार यादवला सुद्धा टीममध्ये स्थान मिळणार. ऋषभ पंत वनडे सीरीजमध्ये उपकर्णधार आहे. त्यामुळे त्याच खेळणं निश्चित आहे. सहाव्या नंबरवर दीपक हुड्डा आणि संजू सॅमसनमध्ये स्पर्धा असेल. हुड्डाची बाजू वरचढ आहे. कारण तो बॅटिंग बरोबर बॉलिंगही करु शकतो.

पहिल्या वनडेसाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन:

शिखर धवन, (कॅप्टन) शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, (विकेटकीपर) दीपक हुड्डा, दीपक चाहर, शार्दुल ठाकुर, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल.