
कॅप्टन सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टीम इंडियाने न्यूझीलंड विरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी 20i मालिकेत आतापर्यंत धमाका केला आहे. टीम इंडियाने नागपूर, रायपूरनंतर गुवाहाटीत सामने जिंकून विजयी हॅट्रिक केली आहे. टीम इंडिया या मालिकेत 3-0 ने आघाडीवर आहे. आता उभयसंघातील चौथा सामना हा बुधवारी 28 जानेवारीला विशाखापट्टममध्ये होणार आहे. या सामन्यात सूर्यकुमार यादव याला 3 हजार टी 20i धावा पूर्ण करण्याची संधी आहे. सूर्याला त्यासाठी फक्त 41 धावांची गरज आहे.