IND vs NZ : वनडे मालिकेत विराट कोहली रचणार 10 विक्रम, काय ते जाणून घ्या
Image Credit source: टीव्ही 9 हिंदीवरून
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेला 11 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी शुबमन गिलच्या नेतृत्वात संघाची घोषणा केली आहे. विराट कोहली आणि रोहित शर्माही या मालिकेत खेळणार आहेत. तीन सामन्यांची वनडे मालिका विराट कोहलीसाठी खास असणार आहे. कारण या मालिकेत विराट कोहली एक दोन नाही तर दहा विक्रम आपल्या नावावर करण्याची शक्यता आहे. सध्या विराट कोहलीचा फॉर्म पाहता त्याला दहा विक्रम सहज सोपं दिसत आहे. विजय हजारे ट्रॉफीतही विराट कोहलीने आपल्या फॉर्मची झलक दाखवून दिली आहे. हा फॉर्म न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत कायम राहिला तर पहिल्या सामन्यापासूनच विक्रमांची रांग लागेल. पहिला वनडे सामना 11 जानेवारीला वडोदरा, दुसरा वनडे 14 जानेवारीला सामना राजकोट आणि तिसरा वनडे सामना 18 जानेवारीला इंदुरला होणार आहे. चला जाणून घेऊयात कोण कोणते विक्रम आपल्या नावावर करणार ते…
हे दहा विक्रम विराट कोहलीच्या रडारवर
- विराट कोहलीने न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत 10 दावा करताच पहिल्या विक्रमाची नोंद करणार आहे. न्यूझीलंडविरुद्ध वनडेत मिळालेल्या विजयात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरणार आहे.
- न्यूझीलंडविरुद्ध 25 धावांचा पल्ला गाठताच सर्वात वेगाने 28 हजार आंतरराष्ट्रीय धावा करणारा फलंदाज ठरणार आहे.
- 73 धावांची केळी करताना विराट कोहली न्यूझीलंडविरुद्ध 3 हजार धावा करणारा दुसरा आशियाई फलंदाज ठरेल.
- विराट कोहलीने या मालिकेत 94 धावांची खेळी करताच. वनडे न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज ठरेल.
- आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसरं स्थान पटकावण्यासाठी फक्त 42 धावांची गरज आहे. या वनडे मालिकेत त्याचा फॉर्म पाहता सहज शक्य आहे.
- विराट कोहलीकडे वनडे क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक धावा करण्याची संधी आहे. यासाठी त्याला 227 धावांची गरज आहे.
- विराट कोहलीने मालिकेत 314 केल्यास न्यूझीलंडविरुद्ध वनडेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरू शकतो.
- विराट कोहलीने तीन पैकी एका सामन्यात शतक ठोकल्यास न्यूझीलंडविरूद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक ठोकणारा फलंदाज ठरेल.
- न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेत 350 धावा करताच विराट कोहली घरच्या मैदानातवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरेल.
- विजयी वनडे सामन्यात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होण्यासाठी फक्त 128 धावा हव्या आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतील तीन सामन्यात त्याच्याकडे ही संधी आहे.