IND vs PAK : महामुकाबल्याआधी टीम इंडियाच्या जसप्रीत बुमराहची दुबईत एन्ट्री, फोटो व्हायरल

India vs Pakistan 2025 Jasprit Bumrah : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याची दुबईत आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये एन्ट्री झाली आहे.

IND vs PAK : महामुकाबल्याआधी टीम इंडियाच्या जसप्रीत बुमराहची दुबईत एन्ट्री, फोटो व्हायरल
jasprit bumrah and virat kohli team india
Image Credit source: jasprit bumrah x account
| Updated on: Feb 23, 2025 | 1:33 PM

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान आमनेसामने आहेत. उभयसंघातील सामन्याला अवघ्या काही मिनिटांत सुरुवात होणार आहे. सामन्याचं आयोजन हे दुबईत आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी एक मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा वेगवान आणि प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह याची या सामन्यासाठी एन्ट्री झाली आहे. जसप्रीत बुमराहचा दुबईत आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये एन्ट्री झाल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

जसप्रीत बुमराह याला पाठीच्या दुखापतीमुळे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं. बुमराहला पाठीच्या दुखापतीमुळे या स्पर्धेतून माघार घ्यावा लागली. बुमराहच्या जागी भारतीय संघात अखेरच्या क्षणी युवा हर्षित राणा याचा समावेश करण्यात आला. हर्षितने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात 3 विकेट्स घेत आपली निवड योग्य ठरवली. भारताने बांगलादेशविरुद्ध विजय मिळवत अप्रतिम सुरुवात केली. त्यानंतर आता टीम इंडिया पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवत 2017 च्या पराभवाची परतफेड करण्यासाठी तयार आहे. या सामन्याआधी बुमराहची दुबईमधील स्टेडियममध्ये एन्ट्री झाली आहे. बुमराह या सामन्यात खेळण्यासाठी नाही, तर भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित आहे.

जसप्रीत बुमराहची दुबईत स्टेडियममध्ये एन्ट्री, फोटो व्हायरल

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा आणि वरुण चक्रवर्ती.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी पाकिस्तान क्रिकेट टीम : मोहम्मद रिझवान (कॅप्टन आणि विकेटकीपर), बाबर आझम, कामरान गुलाम, सलमान आगा, तय्यब ताहिर, खुशदिल शाह, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, अबरार अहमद, हारिस रौफ, मोहम्मद हसनैन, उस्मान खान, इमाम उल हक आणि सौद शकील.