
भारत आणि पाकिस्तान या सामन्यात चुकीला माफी नसते. कारण या दोन्ही देशातील क्रिकेट सामना युद्धापेक्षा कमी नसतो. त्यामुळे आपल्या हातून चूक होऊ नये असंच क्रिकेटपटूंना वाटत असतं. साखळी फेरीतील महत्त्वाच्या सामन्यात नाणेफेकीचा कौल पाकिस्तानच्या बाजूने लागला. भारताने पाकिस्तानच्या धावगतीला काही अंशी खिळ लावली होती. पाकिस्तानच्या दोन विकेट स्वस्तात बाद झाल्या. त्यामुळे पाकिस्तानवर दबाव वाढला होता. पण तिसऱ्या विकेटसाठी कर्णधार मोहम्मद रिझवान आणि सउद शकील यांनी सावध खेळी केली. धावांची गती भले कमी होती. पण पाकिस्तानने खेळ लांबवण्यात यश मिळवलं. रिझवान आणि सउद शकीलने तिसऱ्या विकेटसाठी 104 धावांची भागीदारी केली. मोहम्मद रिझवानने या भागीदारीत 46 धावांचं योगदान दिलं. तर सउद शकीलने अर्धशतकी खेळी केली. एक क्षण असा आला की ही जोडी फोडली नाही तर टीम इंडियाचं टेन्शन वाढू शकतं. त्यामुळे रोहित शर्माने 33 वं षटक हार्दिक पांड्याच्या हाती सोपवलं. पण या षटकात हार्षित राणाने चूक केली.
मोहम्मद रिझवान आणि सउद शकील ही जोडी फोडण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न सुरु होता. दुसरीकडे, धावगती वाढवण्यासाठी मोहम्मद रिझवानने संधी घेण्याचा निर्णय केला. हार्दिक पांड्याच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मोहम्मद रिझवानने उत्तुंग फटका मारला. हा चेंडू इतका वर चढला की सहज झेल असं वाटलं. या चेंडूखाली हार्षित राणा पोहोचलाही. पण झेल काही पकडू शकला नाही. यामुळे हार्दिक पांड्या चांगलाच संतापला. तसेच दोन धावा फुटकच्या आल्या.
Harshit Rana dropped a catch!#ChampionsTrophy2025#ViratKohli#Rizwan#INDvsPAK pic.twitter.com/rWBTwHNPIC
— mbappe fan (@dassonfgg00) February 23, 2025
रिझवान आणि शकील जोडी शेवटच्या षटकात तोडफोड करतील अशी धास्ती क्रीडाप्रेमींना वाटत होती. पण अक्षर पटेलने ही भीती दूर केली. 34 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर मोहम्मद रिझवानला क्लिन बोल्ड केलं. यामुळे हार्षित राणाचा जीव भांड्यात पडला. कारण मोहम्मद रिझवानने आक्रमक खेळी करत धावा केल्या असत्या तर हार्षित राणावर सर्वच स्तरावरून टीकेचा भडिमार झाला असता.