Ravi Shastri | “तो काय…”, रोहित शर्मा याच्या बॅटिंगदरम्यान रवी शास्त्री संतापले, पाहा व्हीडिओ

Ravi Shastri Viral Video | टीम इंडियाने पाकिस्तानचा शनिवारी 7 विकेट्सने धुव्वा उडवत वनडे वर्ल्ड कपमध्ये विजयाची हॅटट्रिक पूर्ण केली. या दरम्यान रवी शास्त्री यांनी जे म्हटलं त्याचा एक व्हीडिओ व्हायरल झाला आहे.

Ravi Shastri | तो काय..., रोहित शर्मा याच्या बॅटिंगदरम्यान रवी शास्त्री संतापले, पाहा व्हीडिओ
| Updated on: Oct 15, 2023 | 7:57 PM

अहमदाबाद | टीम इंडियाने शनिवारी 14 ऑक्टोबरला पाकिस्तान क्रिकेट टीमवर 7 विकेट्सने शानदार विजय मिळवला. टीम इंडियाचा पाकिस्तानवर वर्ल्ड कप इतिहासात आठवा विजय ठरला. पाकिस्तानने आधी बॅटिंग करत 191 धावा केल्या. टीम इंडियाच्या बॉलिंगसमोर पाकिस्तानला 50 ओव्हरही टिकता आलं नाही. पाकिस्तान 42.5 ओव्हरमध्ये 191 धावांवर ऑलआऊट झाली. त्यामुळे टीम इंडियाला विजयासाठी 192 धावांचं आव्हान मिळालं. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी पाकिस्तानला गुंडाळून 50 टक्के विजय निश्चित केला.

आता सर्व जबाबदारी ही बॅट्समन्सवर होती. टीम इंडियाच्या फलंदाजांनीही चाहत्यांचा विश्वास खरा ठरवला. टीम इंडियाने हे आव्हान 30.3 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून पूर्ण केलं. सलामी जोडीनंतर मिडल ऑर्डरमधील फलंदाजांनी योगदान दिल्याने टीम इंडियाने वर्ल्ड कपमधील सलग तिसरा विजय मिळवला. शाहीन अफ्रीदी याने शुबमन गिल आणि कॅप्टन रोहित शर्मा या सलामी जोडीला आऊट केलं. मात्र तोवर शुबमन आणि रोहित या दोघांनी आपलं काम पूर्ण केलं होतं. तर त्यानंतर विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांनी भूमिका चोखपणे पार पाडली.

रोहित शर्मा याने सर्वाधिक 86 धावा केल्या. शुबमन गिल 16 धावा करुन माघारी परतला. विराट कोहली याने 16 धावांचं योगदान दिलं. तर श्रेयस अय्यर आणि केएल राहुल या जोडीने टीम इंडियाला विजयी केलं. केएलने नाबाद 19 धावा केल्या. तर श्रेयस अय्यर याने नाबाद 53 धावांची अर्धशतकी खेळी केली. पाकिस्तानकडून शाहीन याने 6 ओव्हरमध्ये 36 धावांच्या मोबदल्यात 2 विकेट्स घेतल्या. शाहीन अफ्रीदीची सामन्यादरम्यान कॉमेंटेटर रवी शास्त्री यांनी शाळा घेतली. शाहीन ठीकठाक बॉलर आहे तो वसीम अक्रम नाही, असं शास्री म्हणाले. रोहितच्या बॅटिंगदरम्यान शास्री यांनी शाहीनच्या बॉलिंगवर प्रतिक्रिया दिली.

रवी शास्त्री काय म्हणाले?

“शाहीन अफ्रीदी हा काय वसीम अक्रम नाही जे त्याला इतकं डोक्यावर घेतलंय. आता शाहीन नव्या बॉलने विकेट घेतो. आता ओके ओके बॉलर आहे तर तसं बोलायला हवं. फार भारी बॉलर आहे असं म्हणून डोक्यावर बसवायला नको. तो तसा नाहीये हे मान्य करावं लागेल”,असं रवी शास्त्री म्हणाले. रवी शास्त्री यांनी शाहीनबाबत ही प्रतिक्रिया दिली तेव्हा टीम इंडियाच्या डावातील 21 वी ओव्हर सुरु होती.

रवी शास्त्री म्हणाले….

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज

पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन | बाबर आझम (कर्णधार), अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन आफ्रिदी आणि हरिस रौफ.