IND vs PAK: कॅप्टन रोहित विजयानंतर बॅटिंगबाबत नाखूष, स्पष्टच म्हणाला..

India vs Pakistan Rohit Sharma: टीम इंडियाने अटीतटीच्या सामन्यात पाकिस्तानवर कुरघोडी करत शानदार विजय मिळवला. गोलंदाज टीम इंडियाच्या विजयाचं शिल्पकार ठरले. टीम इंडियाचे फलंदाज अपयशी ठरले. याबाबत कॅप्टन रोहितने जाहीर नाराजी व्यक्त केली.

IND vs PAK: कॅप्टन रोहित विजयानंतर बॅटिंगबाबत नाखूष, स्पष्टच म्हणाला..
rohit sharma post match ind vs pak
Image Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Jun 10, 2024 | 2:34 AM

टीम इंडियाने आयसीसी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तान विरुद्धची विजयी घोडदौड यंदाही कायम ठेवली आहे. टीम इंडियाने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये पाकिस्तानचा धुव्वा उडवला आहे. टीम इंडियाला आधी 119 धावाच करता आल्या. पाकिस्तानने प्रत्युत्तरात आश्वासक सुरुवात केली. मात्र त्यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी कमबॅक केलं ज्यामुळे पाकिस्तानला काहीच करता आलं नाही. टीम इंडियाने हा सामना 6 धावांनी जिंकला. टीम इंडियाचा हा वर्ल्ड कप स्पर्धेतील सलग दुसरा विजय ठरला. टीम इंडियाच्या विजयानंतर कॅप्टन रोहित आनंदी दिसला. मात्र टीम इंडियाच्या बॅटिंगबाबत नाराजी व्यक्त केली.

रोहित काय म्हणाला?

“आम्ही चांगली बॅटिंग केली नाही. आम्ही बॅटिंगच्या मध्यापर्यंत चांगल्या स्थितीत होतो. आम्ही आवश्यक भागीदारी करु शकलो नाहीत, ज्यामुळे मागे पडलो. गेल्या (आयर्लंड) सामन्याच्या तुलनेत आताची खेळपट्टी चांगली होती. मात्र अशा गोलंदाजांच्या आक्रमणासमोर आत्मविश्वासाने खेळावं लागतं”, असं रोहितने म्हटलं. टीम इंडिया आयर्लंड विरुद्ध याच मैदानात 5 जून रोजी खेळली होती. या खेळपट्टीवर रोहितला आयर्लंड विरुद्ध खांद्याला दुखापत झाली होती.

रोहित टीम इंडियाच्या विजयानंतर काय म्हणाला?

“पाकिस्तान जेव्हा बॅटिंग करत होती, तेव्हा आम्ही सर्व एकत्र आलो. जर हे असं आपल्यासोबत होऊ शकतं, तर त्यांच्यासोबत ही होऊ शकतं. प्रत्येकाचं थोडंसं योगदान ही खूप मोठा बदल घडवू शकतो”, असंही रोहितने आवर्जून नमूद केलं.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन: रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, ऋषभ पंत (विकटेकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग

पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन: बाबर आझम (कॅप्टन), मोहम्मद रिझवान, उस्मान खान, फखर जमान, शादाब खान, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, नसीम शाह आणि मोहम्मद अमीर.