AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA : रेकॉर्ड ब्रेकर बुमराह, पहिल्याच सामन्यात मोठा विक्रम मोडीत, झटक्यात दोघांना पछाडलं

Jasprit Bumrah Milestone : जसप्रीत बुमराह याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसातील पहिल्या सत्रात कमाल केली. बुमराहने 2 विके्टस घेतल्या. बुमराहने यासह 2 रेकॉर्ड ब्रेक केले.

IND vs SA : रेकॉर्ड ब्रेकर बुमराह, पहिल्याच सामन्यात मोठा विक्रम मोडीत, झटक्यात दोघांना पछाडलं
Team India Jasprit Bumrah Test CricketImage Credit source: PTI
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Nov 14, 2025 | 11:26 PM
Share

टीम इंडियाने मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील पहिला दिवस आपल्या नावावर केला. भारताच्या गोलंदाजांनी पहिला दिवस गाजवला. भारताने दक्षिण आफ्रिकेला झटपट झटके देऊन 159 रन्सवर गुंडाळलं. त्यानंतर भारताने दिवसाचा खेळ संपेपर्यंत 20 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 37 धावा केल्या. भारताने यशस्वी जैस्वाल याच्या रुपात एकमेव विकट गमावली. तर केएल राहुल आणि वॉशिंग्टन सुंदर ही जोडी नाबाद परतली.  टीम इंडिया चांगल्या स्थितीत आहे. आता भारताला आघाडी घेण्यासाठी आणखी 122 धावांची गरज आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी भारतीय फंलदाजांच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे.

बुमराहकडून दक्षिण आफ्रिकेला पहिले 2 झटके

दक्षिण आफ्रिकेला पहिल्याच दिवशी गुंडाळण्यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने प्रमुख भूमिका बजावली. एकट्या बुमराहने दक्षिण आफ्रिकेच्या 5 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. बुमराहने या दरम्यान पहिल्या सत्रात मोठा विक्रम केला. बुमराह यासह 7 वर्षांत खास कामगिरी करणारा पहिला गोलंदाज ठरला. बुमराहने दक्षिण आफ्रिकेच्या सलामी जोडीला आऊट करत हा खास विक्रम आपल्या नावावर केला.

जसप्रीत बुमराह याची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी

बुमराह टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज आहे. बुमराह गेल्या अनेक वर्षांपासून भारतासाठी सातत्याने चमकदार कामगिरी करत आहे. बुमराहने 2018 पासून ते आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेआधी प्रतिस्पर्धी संघातील सलामी जोडीला एकूण 12 वेळा आऊट केलं होतं. यासह बुमराहने इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज स्टूअर्ट ब्रॉड याच्या विक्रमाची बरोबरी केली होती. मात्र बुमराहने 14 नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेच्या सलामी जोडीला आऊट करुन हा खास रेकॉर्ड आपल्या नावावर केला.

बुमराहकडून सलामी जोडीचा गेम

बुमराहने रियान रिकेल्टन याला बोल्ड केलं. तर एडन मार्करम याला विकेटकीपर आणि उपकर्णधार ऋषभ पंत याच्या हाती कॅच आऊट केलं. बुमराहने यासह ब्रॉडच्या नावावर असलेला विक्रम मोडीत काढला.

आर अश्विनला पछाडलं

तसेच अश्विनने रियान रिकेल्टन याला आऊट करण्यासह आणखी एक मोठी कामगिरी केली. रियान बोल्डद्वारे सर्वाधिक विकेट्स मिळवणारा भारताचा तिसरा गोलंदाज ठरला. बुमराहने याबाबतीत माजी फिरकीपटू आर अश्विन याला मागे टाकलं. बुमराहने कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजांना बोल्ड करण्याची 152 वी वेळ ठरली. तर अश्विनने 151 वेळा फलंदाजांची दांडी गुल केली होती.

बोल्डद्वारे सर्वाधिक विकेट्स मिळवणारे भारतीय गोलंदाज

अनिल कुंबळे : 186 विकेट्स

कपिल देव : 167 विकेट्स

जसप्रीत बुमराह : 152 विकेट्स

आर अश्विन : 151 विकेट्स

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल