
रायपूर वनडे सामन्यात नाणेफेकीचा कौल गमावला आणि भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 5 गडी गमवून 358 धावा केल्या आणि विजयासाठी 359 धावांचं आव्हान दिलं. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण अफ्रिकेने सावध सुरुवात केली. क्विंटन डी कॉक स्वस्तात बाद झाल्यानंतर एडन मार्करम आणि कर्णधार टेम्बा बावुमा यांनी दुसऱ्या विकेटसाठी 101 धावांची भागीदारी केली. तर एडन मार्करमने 98 चेंडूत 10 चौकार आणि 4 षटकार मारत 110 धावा केल्या. खरं तर एडन मार्करमचा खेळ 53 धावांवरच आटोपला होता. पण यशस्वी जसस्वालच्या चुकीमुळे त्याने आणखी 57 धावा केल्या आणि 110 धावांची खेळी केली. त्याच्या शतकी खेळीत यशस्वी जयस्वालचं योगदान होतं असं म्हणायला हरकत नाही. कारण त्याने त्याचा सोपा झेल सोडला. त्याचा फटका पुढे टीम इंडियाला बसला.
यशस्वी जयस्वालच्या गचाळ क्षेत्ररक्षणामुळे एडन मार्करमने पहिल्यांदाच भारताविरुद्ध वनडे शतक ठोकलं. संघाचं 18 षटकं टाकण्यासाठी केएल राहुलने कुलदीप यादवच्या हाती चेंडू सोपवला. पहिला चेंडू निर्धाव गेला. त्यानंतर एडन मार्करमने दुसऱ्या चेंडूवर लाँग ऑनच्या दिशेने फटका मारला. खरं तर हा चेंडू यशस्वी जयस्वालच्या हातात सहज बसणारा होता. पण त्यात त्याने चूक केली आणि टीम इंडियाचं नुकसान झालं. कारण हा झेल पकडला असता तर दक्षिण अफ्रिकेवर दबाव वाढला असता. एडन मार्करमने त्यानंतर सावध खेळी केली आणि 88 चेंडूत 52 धावा आणखी करत शतक ठोकलं.
यशस्वी जयस्वाल झेल सोडण्यात माहिर आहे असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. यापूर्वी इंग्लंड दौऱ्यात त्याने गचाळ क्षेत्ररक्षणाचं दर्शन घडवलं होतं. त्याच्या चुकांमुळे टीम इंडियाला अनेकदा भुर्दंड भरावा लागला आहे. त्यामुळे क्रीडारसिकांनी संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. यशस्वी जयस्वाल झेल पकडायला कधी शिकणार? अशा तीव्र प्रतिक्रिया लिहिल्या आहेत. हार्षित राणाच्या गोलंदाजीवर ऋतुराज गायकवाडने त्याचा झेल पकडला. एडन मार्करमची खेळी संपुष्टात आली. मार्करम अजून टिकला असता तर भारतीय गोलंदाजांना कठीण गेलं असतं हे देखील तितकंच खरं आहे.