
दक्षिण आफ्रिकेने रायपूरमध्ये दुसऱ्या आणि करो या मरो अशा सामन्यात विक्रमी धावांचा यशस्वी पाठलाग करत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेसमोर 359 धावांचं आव्हान ठेवलं होतं. दक्षिण आफ्रिकेने हे आव्हान 6 विकेट्सच्या मोबदल्यात 4 बॉलआधी पूर्ण केलं. दक्षिण आफ्रिकने 49.2 ओव्हरमध्ये 362 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेची परदेशात एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात इतक्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्याची पहिली वेळ ठरली. दक्षिण आफ्रिकेने यासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. तर टीम इंडियाची 350 पेक्षा अधिक धावा करुनही पराभव होण्याची दुसरी वेळ ठरली. भारताच्या या पराभवामुळे ऋतुराज गायकवाड आणि विराट कोहली या दोघांची शतकी खेळी व्यर्थ ठरली.
दक्षिण आफ्रिकेच्या विजयात ओपनर एडन मार्रक्रम याने प्रमुख भूमिका बजावली. एडनने सर्वाधिक धावा केल्या. एडनने 110 धावांची शतकी खेळी केली. क्विंटन डी कॉक याला दुहेरी आकडाही गाठता आला नाही. कॅप्टन टेम्बा बवुमा याने 46 धावांचं योगदान दिलं. मॅथ्यू ब्रिट्झके याने 68 धावांची निर्णायक खेळी साकारली. बेबी एबी अर्थात डेवाल्ड ब्रेव्हीस याने 34 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 1 फोरसह चाबूक 54 धावा केल्या. टॉनी डी झॉर्जी 17 रन्सवर रिटायर्ड हर्ट झाला. अर्शदीप सिंह याने मार्को यान्सेन याला 2 रन्सवर मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.
तसेच कॉर्बिन बॉश आणि केशव महाराज या जोडीने अखेरच्या क्षणी निर्णायक भागीदारी करत दक्षिण आफ्रिकेला ऐतिहासिक विजय मिळवून देण्यात योगदान दिलं. कॉर्बिनने नॉट आऊट 26 तर केशवने नाबाद 10 धावा केल्या. तर टीम इंडियाचे गोलंदाज 358 धावांचा यशस्वी बचाव करण्यात अपयशी ठरले. अर्शदीप सिंह आणि प्रसिध कृष्णा या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर हर्षित राणा आणि कुलदीप यादव या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली. मात्र त्याचा काहीही फायदा झाला नाही.
दक्षिण आफ्रिकेने पुन्हा नाणेफेक जिंकून भारताला बॅटिंगसाठी भाग पाडलं. रोहित शर्माच्या रुपात भारताने पहिली विकेट गमावली. रोहित 14 धावांवर आऊट झाला. रोहितनंतर यशस्वी जैस्वाल याने 22 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला.
त्यानंतर विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाड या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 195 रन्सची पार्टनरशीप केली. ऋतुराजने या दरम्यान 77 बॉलमध्ये आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील पहिलंवहिलं शतक झळकावलं.
ऋतुराजनंतर विराटनेही शतक पूर्ण केलं. विराटने शतकापर्यंत पोहचण्यासाठी 90 चेंडूंचा सामना केला. विराटचं हे सलग दुसरं शतक ठरलं. मात्र शतकानंतर ऋतुराज आणि विराट आऊट झाले. वॉशिंग्टन सुंदर 1 धाव करुन रन आऊट झाला.
भारताचा रायपूरमध्ये पराभव
South Africa win the 2nd ODI by 4 wickets.
We go to Vizag with the series levelled at 1-1.
Scorecard ▶️ https://t.co/oBs0Ns6SqR#TeamIndia | #INDvSA | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/rGOhm95NnI
— BCCI (@BCCI) December 3, 2025
कॅप्टन केएल राहुल आणि रवींद्र जडेजा या जोडीने सहाव्या विकेटसाठी 54 बॉलमध्ये नॉट आऊट 69 रन्सची पार्टनरशीप केली. केएलने 43 बॉलमध्ये 66 रन्स केल्या. तर जडेजाने 27 चेंडूत 24 धावांचं योगदान दिलं.दक्षिण आफ्रिकेसाठी मार्को यान्सेन याने 2 विकेट्स घेतल्या. तर नांद्रे बर्गर आणि लुंगी एन्गिडी या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.