AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli Century: किंग कोहलीचा धमाका, सलग दुसऱ्या शतकासह विराट कामगिरी, सचिनचा महारेकॉर्ड ब्रेक

Virat Kohli Broke Sachin Tendulkar Record : भारताचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली याने रायपूरमध्ये शतक ठोकलं. विराटने यासह क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याचा महारेकॉर्ड उद्धवस्त केला.

Virat Kohli Century: किंग कोहलीचा धमाका, सलग दुसऱ्या शतकासह विराट कामगिरी, सचिनचा महारेकॉर्ड ब्रेक
Virat Kohli Century RaipurImage Credit source: PTI
| Updated on: Dec 03, 2025 | 9:30 PM
Share

टीम इंडियाची रनमशीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विराट कोहली याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही झंझावात कायम राखला आहे. विराटने सलग दुसरं शतक ठोकसं आहे. विराटने रांचीनंतर रायपूरमध्येही शतक झळकावलं. टीम इंडियाच ओपनर रोहित शर्मा लवकर आऊट झाल्यांनतर विराट तिसऱ्या स्थानी बॅटिंगसाठी आला. विराटने यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांच्यासह भागीदारी करत शतक झळकावलं. विराटने या शतकासह खास विक्रम आपल्या नावावर केला. विराट एकाच स्थानी खेळताना सर्वाधिक शतकं करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. विराटने यासह भारताचा दिग्गज माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला आहे.

विराटचा शतकी धमाका

दक्षिण आफ्रिकेने सलग दुसर्‍या सामन्यात नाणेफेक जिंकत भारताला बॅटिंगसाठी भाग पाडलं. रोहित आणि यशस्वी या सलामी जोडीने 40 धावा जोडल्या. त्यानंतर रोहित आऊट झाला. रोहितनंतर विराट मैदानात आला. त्यानंतर यशस्वी टीम इंडियाच्या 62 रन्स असताना आऊट झाला. टीम इंडियाची सलामी जोडी आऊट झाल्याने विराटवर पुन्हा एकदा जबाबदारी आली. विराटने ऋतुराज याच्यासह तिसऱ्या विकेटसाठी 195 धावांची मोठी भागीदारी केली. या भागीदारीमुळे टीम इंडिया भक्कम स्थितीत पोहचली.

विराटचं 53 वं एकदिवसीय शतक

विराटने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना संधी मिळेल तेव्हा मोठे फटके मारले. विकाटने 47 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. विराटने अर्धशतकानंतरही फटकेबाजी कायम ठेवली. विराटने फटकेबाजी करत शतकापर्यंत मजल मारली. विराटने यासह एकदिवसीय क्रिकेटमधील 53 वं शतक पूर्ण केलं.

विराटला ही खेळी आणखी मोठी करण्याची संधी होती. विराटला सहज दीडशतक करण्याची संधी होती. मात्र विराट शतकानंतर आऊट झाला. विराटने 93 बॉलमध्ये 102 रन्स केल्या. विराटने या शतकासह काही खास विक्रम आपल्या नावावर केले.

विराटने सचिनला पछाडलं

सचिनने ओपनर म्हणून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 45 शतकं झळकावली होती. तर विराटने तिसऱ्या स्थानी बॅटिंग करत 46 वं एकदिवसीय शतक पूर्ण केलं. विराट यासह एका स्थानी खेळताना सर्वाधिक शतकं करणारा पहिला फलंदाज ठरला.

तसेच विराट वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक 11 वेळा सलग 2 किंवा त्यापेक्षा अधिक शतक झळकावणारा फलंदाज ठरला. या यादीत दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज एबी डी व्हीलियर्स दुसर्‍या स्थानी आहे. एबीने 6 वेळा सलग 2 शतकं झळकावली होती.

भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा.