IND vs SA : टीम इंडिया फायनल मॅचसाठी वायझॅगमध्ये, विराट कोहली याचा व्हीडिओ व्हायरल, पाहा

India vs South Africa 3rd Odi : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका 2 सामन्यांनंतर 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे.

IND vs SA : टीम इंडिया फायनल मॅचसाठी वायझॅगमध्ये, विराट कोहली याचा व्हीडिओ व्हायरल, पाहा
Virat Kohli and Arshdeep Singh
Image Credit source: Bcci x Account
Updated on: Dec 05, 2025 | 2:15 AM

टीम इंडिया दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर कमबॅक करण्यासाठी सज्ज आहे. दक्षिण आफ्रिकेने ऐतिहासिक कामगिरी करत करो या मरो सामन्यात विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेने 359 धावांचं आव्हान 49.2 ओव्हरमध्ये पूर्ण करत 4 विकेट्स हा सामना जिंकला. दक्षिण आफ्रिकेने रायपूरमध्ये विजय मिळवत मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. दक्षिण आफ्रिकने या विजयासह रांचीतील पराभवाची परतफेड केली. आता तिसरा आणि अंतिम सामन्यात मालिकेचा विजेता ठरणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ या सामन्यासाठी पूर्ण ताकदीने उतरणार आहे.

विराटचा व्हीडिओ व्हायरल

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा आणि अंतिम सामना हा विशाखापट्टणमध्ये 6 डिसेंबरला होणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडिया वायझॅगमध्ये दाखल झाली आहे. विमानतळावर विराट आणि टीम इंडियाला पाहण्यासाठी क्रिकेट चाहत्यांनी एकच गर्दी केली होती. टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याचा वायझॅगमध्ये दाखल झाल्यानंतरचा एक व्हीडिओ व्हायरल झाला आहे.

तसेच टीम इंडिया या सामन्यासाठी वायझॅगमध्ये पोहचल्यानंतरचे फोटो बीसीसीआयने पोस्ट केले आहेत. बीसीसीआयने टीम इंडियाच्या बहुतांश खेळाडूंचे फोटो हे एक्स या सोशल मीडियावरुन चाहत्यांसह शेअर केले आहेत.

सर्व तिकीट बूक;स्टेडियम खचाखच भरणार!

वायझॅगमध्ये तिसर्‍या सामन्यासह मालिका विजेता ठरणार आहे. त्यामुळे या सामन्याची क्रेझ आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या सामन्याची सर्व तिकीटांची विक्री झाली आहे. या सामन्याची तिकीटं ऑनलाईन उपलब्ध करण्यात आली होती. मात्र या तिकीटांची क्षणात विक्री झाली. यावरुन चाहत्यांमध्ये किती उत्सूकता आहे, हे स्पष्ट होतं.

आतापर्यंत मालिकेत काय झालं?

टीम इंडियाने केएल राहुल याच्या नेतृत्वात मालिकेत विजयी सुरुवात केली. भारताने विराट कोहली आणि रोहित शर्मा या जोडीने केलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेसमोर 350 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र दक्षिण आफ्रिकेला 332 धावांपर्यंतच पोहचता आलं. भारताने अशाप्रकारे हा सामना जिंकत मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.

विराटचा व्हायरल व्हीडिओ

त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने दुसर्‍या सामन्यात पलटवार करत सामना जिंकला. दक्षिण आफ्रिका इंडिया विरुद्ध 359 धावांचा यशस्वी पाठलाग करणारी ऑस्ट्रेलियानंतर संयुक्तरित्या पहिली टीम ठरली. त्यानंतर आता तिसरा आणि अंतिम सामना जिंकून कोणता संघ मालिका उंचावणार? हे 6 डिसेंबरला स्पष्ट होणार आहे.