AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SA vs IND : भारताला मालिका विजयाची संधी, दक्षिण आफ्रिका रोखणार का?

South Africa vs India 4th T20i : टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20i मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. त्यामुळे चौथ्या आणि अंतिम सामन्यात टीम इंडियाला विजयासह मालिकेवर नाव कोरण्याचं संधी आहे. तर दक्षिण आफ्रिकेवर मालिका पराभवाची टांगती तलवार आहे.

SA vs IND : भारताला मालिका विजयाची संधी, दक्षिण आफ्रिका रोखणार का?
team india huddle talkImage Credit source: suryakumar yadav x account
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Nov 14, 2024 | 7:02 PM
Share

टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला बुधवारी 13 नोव्हेंबरला रंगतदार झालेल्या तिसऱ्या टी 20I सामन्यात 11 धावांनी पराभूत केलं. टीम इंडियाने यासह 4 सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशा फरकाने आघाडी घेतली. आता टीम इंडियाचं लक्ष्य हे चौथ्या आणि अंतिम सामन्यात विजय मिळवून मालिकेवर नाव कोरण्याकडे आहे. एका बाजूला भारतीय संघ मालिका विजयासाठी सज्ज आहे. तर दुसऱ्या बाजूला यजमान दक्षिण आफ्रिकेसमोर हा शेवटचा सामना जिंकून मायदेशात मालिका पराभव टाळण्याचं आव्हान असणार आहे. त्यामुळे या अंतिम सामन्यात चुरस पाहायला मिळणार आहे.

सूर्यकुमार यादव टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर एडन मार्करम याच्याकडे दक्षिण आफ्रिकेची सूत्रं आहेत. या सामन्याचं आयोजन हे वांडरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग येथे करण्यात आलं आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 8 वाजता टॉस होणार आहे. सामना टीव्हीवर स्पोर्ट्स 18 नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

आकडे कुणाचे भारी?

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया यांच्यात आतापर्यंत एकूण 30 टी 20i सामने खेळवण्यात आले आहेत. त्यापैकी भारताने 17 तर दक्षिण आफ्रिकने 12 सामन्यात विजय मिळवला आहे. उभयसंघांमध्ये 2022 पासून 15 सामने झाले आहेत. त्या 15 पैकी 8 वेळा भारताने विजय मिळवलाय. तर दक्षिण आफ्रिकेला 6 वेळा विजय मिळवता आला आहे. भारताची दक्षिण आफ्रिकेतील कामगिरीही अप्रतिम राहिली आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेत 12 टी 20i सामने खेळले आहेत. त्यापैकी भारताने 8 वेळा दक्षिण आफ्रिकेला पराभवाची धुळ चारली आहे. तर दक्षिण आफ्रिकेने 4 वेळा भारताला चितपट केलंय.

दक्षिण आफ्रिके विरूद्धच्या टी 20i मालिकेसाठी टीम इंडिया : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रमनदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजयकुमार वैशाख, अवेश खान आणि यश दयाल.

T20I सीरिजसाठी दक्षिण आफ्रिका टीम : एडन मार्करम (कॅप्टन), ओटनील बार्टमन, गेराल्ड कोएत्झी, डोनोव्हन फरेरा, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅन्सन, हेनरिक क्लासेन, पॅट्रिक क्रुगर, केशव महाराज, डेव्हिड मिलर, मिहलाली मपोंगवाना, न्काबा पीटर, रायन सिमलेटन, रायन रिकेल लुथो सिपमला (तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यासाठी) आणि ट्रिस्टन स्टब्स.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...