IND vs SA: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ODI मालिकेसाठी भारताच्या वनडे संघात दोन बदल

कोविडची लागण झाल्यामुळे वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar)दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेला (ODI Series) मुकणार आहे.

IND vs SA: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ODI मालिकेसाठी भारताच्या वनडे संघात दोन बदल

मुंबई: कोविडची लागण झाल्यामुळे वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar)दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेला (ODI Series) मुकणार आहे. त्याच्याजागी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) फिरकी गोलंदाज जयंत यादवची निवड केली आहे. कसोटी मालिका संपल्यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. मोहम्मद सिराजही दुखापतग्रस्त असल्याने कव्हर म्हणून नवदीप सैनीचा संघात समावेश करण्यात आला आहे.

सिराजला दुसऱ्या कसोटीत हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. सुंदरला कोविडची लागण झाल्यामुळे तो एकदिवसीय मालिकेत खेळणार नाहीय. सुंदरला आज सकाळी भारतीय संघासोबत दक्षिण आफ्रिकेला रवाना व्हायचे होते. 19 जानेवारीपासून वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे.

मोहम्मद सिराजला बॅकअप म्हणून नवदीप सैनीचा संघात समावेश करण्यात आला आहे. 19 जानेवारी, 21 जानेवारी आणि 23 जानेवारीला वनडे सामने होणार आहेत. केपटाऊनमध्ये तिसरा वनडे सामना होईल. जयंत यादवने 2016 मध्ये एकमेव वनडे सामना खेळला होता. त्यानंतर संघातून त्याला वगळण्यात आलं. कदाचित यावेळी त्याला वनडेमध्ये खेळण्याची संधी मिळू शकते.


Published On - 5:19 pm, Wed, 12 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI