IND vs SA : भारताला पहिल्या पराभवानंतर Wtc Final मध्ये पोहचण्याची किती संधी?
Team India WTC 2027 final scenarios: भारताला विराट कोहली आणि रोहित शर्मा याच्या नेतृत्वात एकूण 2 वेळा टेस्ट वर्ल्ड कप ट्ऱॉफीने हुलकावणी दिलीय. त्यामुळे भारताचा चौथ्या साखळीत तिसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहचण्याचा प्रयत्न असणार आहे.

टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी पराभव झाला. दक्षिण आफ्रिकेने यासह 2 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. तर टीम इंडियाला पराभवासह दुहेरी झटका बसला. टीम इंडियाचं या पराभवानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीतील पॉइंट्स टेबलमध्ये नुकसान झालं आहे. टीम इंडियाची एका पराभवामुळे पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावरुन चौथ्या स्थानी घसरण झाली आहे. या एका पराभवामुळे टीम इंडियाचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पिशीप फायनलमध्ये खेळण्याचं समीकरण बिघडलं आहे. मात्र त्यानंतरही टीम इंडिया अंतिम फेरीसाठी कशी पात्र ठरु शकते? हे आपण समजून घेऊयात.
भारताने आतापर्यंत या वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीप 2025-2027 या साखळीत एकूण 2 मालिका खेळल्या आहेत. भारताने इंग्लंड विरुद्ध 5 तर वेस्ट इंडिया विरुद्ध 2 सामने खेळले आहेत. भारताने या 7 पैकी 4 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. भारताला 2 वेळा पराभूत व्हावं लागलंय. तर 1 सामना अनिर्णित राहिलाय. तर भारताला या स्पर्धेतील आपल्या तिसऱ्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने पहिल्या सामन्यात पराभूत केलं. त्यामुळे भारताचा या साखळीतील हा एकूण तिसरा पराभव ठरला आहे.
भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत आणखी 1 सामना खेळायचा आहे. त्यानंतर टीम इंडिया एकूण 3 मालिका खेळणार आहे. भारताला अशाप्रकारे एकण या साखळीत एकूण 10 सामने खेळायचे आहेत. भारतासमोर उर्वरित 3 मालिकांमध्ये कोणत्या 3 संघांचं आव्हान असणार? हे जाणून घेऊयात.
3 संघ आणि 9 सामने
टीम इंडिया उर्वरित 3 पैकी सलग 2 मालिका या प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध त्यांच्या घरात खेळणार आहे. तर टीम इंडिया या साखळीतील आपली सहावी आणि शेवटची मालिका मायदेशात खेळणार आहे.
टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेनंतर थेट ऑगस्ट 2026 मध्ये आपली चौथी मालिका खेळणार आहे. टीम इंडिया श्रीलंकेविरुद्ध एकूण 2 सामने खेळणार आहे. त्यानंतर टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यात 2 सामने खेळणार आहे. तर सहाव्या आणि शेवटच्या मालिकेत टीम इंडिया मायदेशात ऑस्ट्रेलिया विरुद्ध 5 सामने खेळणार आहे.
अंतिम फेरीचं समीकरण
टीम इंडियाने आतापर्यंत सलग आणि एकूण 2 वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीप स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली आहे. मात्र दोन्ही वेळेस भारताचा पराभव झालाय. मात्र टीम इंडिया तिसऱ्या साखळीत अंतिम फेरीत पोहचण्यात अपयशी ठरली. त्यामुळे भारताचा चौथ्या साखळीत अंतिम फेरीत पोहचण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यासाठी भारताला उर्वरित एकूण 10 पैकी किमान 7 सामने जिंकावे लागणार आहेत. भारताने 7 सामने जिंकल्यानंतर 136 पॉइंट्स होतील. तसेच विजयी टक्केवारी 62.96 इतकी होईल. मात्र भारताला उर्वरित 3 पैकी 2 मालिकांसाठी विदेशात जायचं आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी या दोन्ही मालिका आव्हानात्मक ठरणार आहेत. त्यामुळे टीम इंडिया कशी कामगिरी करते? याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.
