अरे रे रे…! कसोटीत यशस्वी जयस्वालचं नशिब निघालं फुटकं, कसा रन आऊट झाला बघा Video

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात यशस्वी जयस्वालचं नशिब फुटकं निघालं. खरं तर खेळपट्टीवर त्याचा जम बसला होता. पण धावचीत झाल्याने मैदाना सोडावं लागलं. कसं काय झालं ते जाणून घ्या

अरे रे रे...! कसोटीत यशस्वी जयस्वालचं नशिब निघालं फुटकं, कसा रन आऊट झाला बघा Video
अरे रे रे...! कसोटीत यशस्वी जयस्वालचं नशिब निघालं फुटकं, कसा रन आऊट झाला बघा Video
Image Credit source: Twitter/video grab
| Updated on: Aug 15, 2026 | 11:25 AM

भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिला कसोटी सामना गॉलमध्ये सुरू आहे. भारताने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. सलामीला आलेल्या केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल यांनी आश्वासक सुरूवात केली. पण 11 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर यशस्वी जयस्वालचा खेळ आटोपला. भारतीय संघाच्या 47 धावा असताना पहिला धक्का बसला. यासाठी श्रीलंकेला फार काही मेहनत घ्यावी लागली नाही. गोंधळेल्या स्थितीतून यशस्वी जयस्वालची फुकटची विकेट मिळाली. खरं तर यशस्वी जयस्वाल स्थिर स्थावर झाला होता होता. त्यामुळे त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण क्रीडाप्रेमींचा अपेक्षा भंग झाला. यशस्वी जयस्वाल 37 चेंडूत 32 धावा करून तंबूत परतला. या खेळीत त्याने 5 चौकार मारले आणि त्याचा स्ट्राईक रेट हा 86.49 चा होता.

यशस्वी जयस्वालसोबत नेमकं काय झालं?

केशरा नुवन्था गोलंदाजी करत होता आणि शेवटच्या चेंडूवर केएल राहुल स्ट्राईकला होता. या चेंडूवर केएल राहुलने समोरच्या दिशेने चेंडू मारला. केशराने चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न केला आणि त्यात यशस्वी जयस्वालसोबत टक्कर झाला. केशराच्या हातून चेंडू निसटल्याने केएल राहुलने क्रीज सोडलं होतं. पण यशस्वी जयस्वाल गोंधळलेल्या स्थितीत होता म्हणून थांबला. त्यातून सावरत यशस्वीने धावण्याचा प्रयत्न केला. जयस्वालच्या या गोंधळलेल्या संकेताला केएलने पुन्हा धाव घेण्यासाठी होकारार्थी मानले आणि पुढे सरसावला. पण यशस्वी जयस्वाल पुन्हा मागे सरकला. दुसरीकडे, रनआऊटची संधी हेरून प्रभातने चेंडू यष्टीरक्षकाकडे फेकला. दरम्यान नॉन स्ट्राईकर एन्डला जयस्वालच्या आधी केएलने बॅट जमिनीवर टेकवली होती, त्यामुळे जयस्वाल बाद झाला.

यशस्वी जयस्वाल कसोटी क्रिकेटमध्ये धावचीत होण्याची तही ही तिसरी वेळ आहे. 2024 मध्ये एमसीजीवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि गेल्या वर्षी दिल्लीत वेस्ट इंडिजविरुद्ध धावबाद झाला होता. त्यानंतर जयस्वाल तिसऱ्यांदा कसोटी सामन्यात धावबाद झाला आहे . त्या दोन डावांमध्ये म्हणजेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध 82 आणि वेस्ट इंडिजविरुद्ध 175 धावा केल्या होत्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us