केएल राहुलचा जोरदार फटका आणि चेंडू श्रीलंकन खेळाडूच्या डोक्यावर लागला, थेट मैदानाबाहेर गेला
भारत आणि श्रीलंका यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात भारताने लंच ब्रेकपर्यंत 1 गडी गमवून 101 धावा केल्या. देवदत्त पडिक्कल नाबाद 35 आणि केएल राहुल नाबाद 32 धावांवर खेळत आहे. असं असताना एका घटनेने क्रीडाप्रेमी अस्वस्थ झाले. या सामन्यात हेल्मेटमुळे श्रीलंकन खेळाडू थोडक्यात वाचला.

गॉल आंतरराष्ट्रीय मैदानात भारत श्रीलंका यांच्यात पहिला कसोटी सामना सुरू आहे. नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताला या सामन्याच्या पहिल्या सेशनमध्ये यशस्वी जयस्वालच्या रुपाने धक्का बसला. त्याला धावचीत होत मैदान सोडवं लागलं. पण या सामन्याच्या सुरूवातील एक धाकधूक वाढवणारा प्रकार घडला. डावाच्या 10 व्या षटकात केएल राहुल फलंदाजी करत होता. हे षटक प्रभात जयसूर्या टाकत होता आणि पाचव्या चेंडूवर केएल राहुल स्वीप शॉट खेळला. त्याने हा फटका जोरात मारला होता. त्यामुळे झेल पकडण्यासाठी शॉर्ट लेगला उभ्या असलेल्या निशान मधुशंकाच्या डोक्यावर लागला. सुदैवाने जवळ फिल्डिंग करत असताना त्याने हेल्मेट घातलं होतं. त्यामुळे थोडक्यात फार काही झालं नाही, पण त्याला वेदना मात्र झाल्या. केएल राहुलही या प्रकारानंतर चिंताग्रस्त दिसला.
केएल राहुल धावत त्याच्याकडे गेला
केएल राहुलने स्वीप शॉट मारल्यानंतर 1 धाव घेतली खरी पण काय झालं आहे याचा अंदाज त्याला होता. त्यामुळे धाव पूर्ण झाल्यानंतर लगेच निशानच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी जवळ गेला. या दरम्यान श्रीलंकन फिजियोही धावत तिथे पोहोचले. त्यांनी चेंडू ज्या ठिकाणी लागला त्या भागाची तपासणी केली. त्यानंतर निशानला तात्काळ मैदानाबाहेर नेण्याचा निर्णय घेतला गेला. निशान मधुशका कन्कशन पीडित ठरला. गॉल कसोटीत पहिल्या डावात केएल राहुल 12 धावांवर खेळत होता. तेव्हा संघाच्या 38 धावा झाल्या होत्या.
INJURY – Nishan Madushka goes out of ground as bat hits hard on his helmet.
No official confirmation and updates on Nishan Madushka via SLC. 🇱🇰 pic.twitter.com/hn18sg7MGQ
— Maina Singh (@Maina_Singhx77) August 15, 2026
कन्कशन नियम काय सांगतो?
कन्कशन हा नियम खेळाडूच्या सुरक्षेसाठी आहे. सामन्यादरम्यान एखाद्या खेळाडूच्या डोक्याला किंवा मानेला दुखापत झाली तर त्याच्या जागी दुसऱ्या पूर्णवेळ खेळाडूला संधी दिली जाते. हा नियम आयसीसीने 1 ऑगस्ट 2019पासून लागू केलाआहे. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात हा नियम लागू आहे. दुखापतग्रस्त खेळाडूच्या जागी येणारा दुसरा खेळाडू हा त्याच भूमिकेतील असणं बंधनकारक आहे. फलंदाजाच्या फलंदाज, गोलंदाजाच्या जागी गोलंदाज घ्यावा लागतो. निशान मधुशका हा फलंदाज आहे. त्याच्या जागी पासिंदू सूरियबांदरा मैदानात उतरवलं आहे. पण कन्कशनचा निर्णय अद्याप जाहीर झालेला नाही. त्यामुळे निशान उतरणार की पासिंदू मधुशकला संधी मिळणार हे गुलदस्त्यात आहे.