AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL 2nd T20I : श्रीलंका विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यात पुणेकर खेळाडूला संधी

संजू सॅमसनच्या (Sanju Samson) दुखापतीमुळे दुसऱ्या टी 20 सामन्यात पुणेकर खेळाडूला संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

IND vs SL 2nd T20I : श्रीलंका विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यात पुणेकर खेळाडूला संधी
Image Credit source: फाईल फोटो
| Updated on: Jan 05, 2023 | 6:43 PM
Share

Rahul Tripathi T20I Debut : टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसरा टी 20 सामना गुरुवार (5 जानेवारी) पार पडणार आहे. टीम इंडियाने टॉस जिंकून श्रीलंकेला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. टीम इंडियाने दुसऱ्या सामन्यासाठी प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल केले आहेत. प्लेईंग इलेव्हनमध्ये पुणेकर खेळाडूला संधी देण्यात आली आहे. (ind vs sl 2nd odi team india may be give chance debut to punekar rahul tripathi against sri lanka at maharashtra cricket stadium pune)

बॅट्समन राहुल त्रिपाठीला श्रीलंका विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 त पदार्पणाची संधी मिळाली आहे.  राहुल जन्माने रांचीचा असला तरी त्याचं पुण्यासोबत खास कनेक्शन आहे. राहुल देशांतर्गत क्रिकेटमध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतो. तसेच त्याने आयपीएलमधील डेब्यू हे पुणे जायट्संकडून 2017 साली केलं होतं. विशेष म्हणजे राहुलचं आयपीएल पदार्पण हे सुद्धा पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियममधूनच झालं होतं. त्यात आता राहुलचं टी 20 पदार्पणही पुण्यातील याच मैदानात झालंय. त्यामुळे  त्यासाठी एमसीए स्टेडियम हे अविस्मरणीय ठरंलय.

राहुल त्रिपाठीचं टी 20 डेब्यू

त्रिपाठीची आयपीएल कारकीर्द

राहुल आतापर्यंत आयपीएलमध्ये 76 सामने खेळला आहे. या सामन्यात राहुलने 140.8 च्या स्ट्राईक रेटने 1 हजार 798 धावा केल्या आहेत. यामध्ये 10 अर्धशतकांचा समावेश आहे. राहुलने आयपीएल पदार्पण हे पुण्याकडून दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध केलं होतं. त्यानंतर तो राहुलने राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबादचं प्रतिनिधित्व केलं आहे.

अमरावतीच्या जितेश शर्माचा समावेश

दरम्यान संजू सॅमसनच्या जागी टीम इंडियात रणजी ट्रॉफीत विदर्भासाठी खेळणाऱ्या आणि मुळचा अमरावतीचा असलेल्या जितेश शर्माचा समावेश करण्यात आला आहे. मात्र जितेशऐवजी राहुलला पदार्पणाची संधी देण्यात आली आहे.

दुसऱ्या टी 20 साठी टीम इंडिया : हार्दिक पंड्या (कॅप्टन), शुबमन गिल, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, राहुल त्रिपाठी, दीपक हुड्डा, अक्षर पटेल, शिवम मावी, अर्शदीप सिंह, उमरान मलिक आणि युजवेंद्र चहल.

Follow Us
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
Sanjay Raut | गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील हुकूमशाही...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली बाप्पांची मूर्ती
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव...
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव शंकर थीम ठरतेय आकर्षण
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश, ट्वीट करत दिल्या शुभेच्छा
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ