AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL 2nd T20 : टीम इंडिया विजयानंतरही बदलणार प्लेइंग 11, या तिघांची ‘विकेट’?

टीम इंडियाची (Team India) बॅटिंग आणि बॉलिंग ऑर्डर पहिल्या सामन्यात छाप सोडण्यात काही प्रमाणात अपयशी ठरली.

IND vs SL 2nd T20 : टीम इंडिया विजयानंतरही बदलणार प्लेइंग 11, या तिघांची 'विकेट'?
| Updated on: Jan 04, 2023 | 11:16 PM
Share

पुणे : टीम इंडियाने श्रीलंकेवर पहिल्या टी 20 सामन्यात 2 धावांनी थरारक विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. आता मालिकेतील दुसरा सामना 5 जानेवारीला पुण्यातील गहुंज स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. सहसा विनिंग प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केला जात नाही. मात्र दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. (ind vs sl 2nd t20 team india probable playing 11 against sri lanka hardik pandya maharashtra cricket stadium pune)

टीम इंडियाची बॅटिंग आणि बॉलिंग ऑर्डर पहिल्या सामन्यात छाप सोडण्यात काही प्रमाणात अपयशी ठरली. त्यामुळे बदल होऊ शकतो. मात्र हे वाटतं तितकं सोपं नाही. कार टीम मॅनेजमेंटने खेळाडूंना संधी देण्याबाबत शब्द दिला आहे. त्यामुळे पहिल्याच सामन्यातील प्लेइंग इलेव्हन दुसऱ्या सामन्यातही कायम ठेवण्यात येऊ शकते, असंही म्हटलं जात आहे. मात्र तरीही 3 खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमधून डच्चू मिळण्याची शक्यता आहे, ज्यातून एकाची विकेट ठरलीय.

संजू सॅमसन

टीम इंडियात संजू सॅमसनला सातत्याने संधी न दिल्याचा आरोप बीसीसीआयवर करण्यात आला आहे. तसेच बीसीसीआय संजूसोबत भेदभाव करत असल्याचंही नेटकऱ्यांनी म्हटलं. मात्र संजूला श्रीलंका विरुद्धच्या पहिल्या सामन्यात विशेष काही करता आलं नाही. संजू 5 धावा करुन माघारी परतला. यानंतरही संजूला प्लेइंग इलेव्हनमधून वगळलं नसतं. पण संजूला दुखापत झाली आहे. रिपोर्टनुसार, गुडघ्याच्या दुखापतीमुळे संजूला दुसऱ्या सामन्यात खेळता येणार नाही.

त्रिपाठीला पदार्पणाची संधी मिळणार?

संजू बाहेर पडल्याने आता त्याच्या जागी कोण खेळणार असा सवाल आहे. ऋतुराज गायकवाड आणि राहुल त्रिपाठी असे 2 पर्याय टीम इंडियाकडे आहेत. मात्र राहुल त्रिपाठीला पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता आहे. ऋतुराज आणि राहुल ही ओपनिंग जोडी आहे. मात्र दोघांना मिडल ऑर्डरमध्ये खेळण्याचा अनुभव आहे. तसेच संजूचा बदली खेळाडू म्हणूनही तो परफेक्ट आहे.

चहल-हर्षल आऊट?

गोलंदाजांमध्ये युजवेंद्र चहल आणि हर्षल पटेल या दोघांवरही प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर पडण्याची टांगती तलवार आहे. दोघेही पहिल्या सामन्यात महागडे ठरले. चहलच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला संधी मिळू शकते.

तर पहिल्या सामन्यात अर्शदीप सिंहला प्रकृती उत्तम नसल्याने खेळता आलं नव्हतं. मात्र आता अर्शदीप फीट आहे. पहिल्या सामन्यात अर्शदीपच्या जागी शिवम मावीला पदार्पणाची संधी मिळाली. मावीने या संधीचं सोनं केलं. पहिल्याच सामन्यात 4 विकेट्स घेतल्या. तर दुसऱ्या बाजूला हर्षल पटेल अपयशी ठरला. त्यामुळे हर्षलची प्लेइंग इलेव्हनमूधन विकेट पडू शकते.

टीम इंडिया संभावित प्लेइंग इलेव्हन :

हार्दिक पंड्या (कप्तान), शुबमन गिल, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, राहुल त्रिपाठी, दीपक हुड्डा, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, शिवम मावी, अर्शदीप सिंह आणि उमरान मलिक.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.