IND vs SL, 2nd T20I : सूर्यकुमार-अक्षर पटेलची अर्धशतकी झुंज अपयशी, श्रीलंकेचा 16 धावांनी विजय

श्रीलंकेने टीम इंडियावर दुसऱ्या टी 20 सामन्यात 16 धावांनी विजय मिळवला. या विजयासह श्रीलंकेने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली आहे.

IND vs SL, 2nd T20I : सूर्यकुमार-अक्षर पटेलची अर्धशतकी झुंज अपयशी, श्रीलंकेचा 16 धावांनी विजय
| Updated on: Jan 05, 2023 | 11:17 PM

पुणे : शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेल्या रंगतदार सामन्यात अखेर टीम इंडियाचा पराभव झाला आहे. श्रीलंकेने टीम इंडियावर 16 धावांनी विजय मिळवला आहे. टीम इंडियाला श्रीलंकेने विजयासाठी 207 धावांचे आव्हान दिले होते. मात्र टीम इंडियाला 20 ओव्हर्समध्ये 8 विकेट्स गमावून 190 धावाच करता आल्या. टीम इंडियाकडून अक्षर पटेल आणि सूर्यकुमार यादव या दोघांनी सर्वाधिक धावा केल्या. अक्षरने 65 तर सूर्याने 51 रन्स केल्या.तर शिवम मावीने अखेरच्या काही षटकांमध्ये निर्णायक क्षणी 26 धावा केल्या. श्रीलंककेकडून दिलशान मधुशंका, कसून राजिथा आणि दासून शनाका या तिकडीने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. या विजयासह श्रीलंकेने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली आहे. (ind vs sl 2nd t20i sri lanka beat team india by 16 runs and series level at mca pune)

बॅटिंग ऑर्डर फ्लॉप

टीम इंडियाच्या बॅटिंग ऑर्डरने अपवाद वगळता निराशा केली. इशान किशन, शुबमन गिल आणि राहुल त्रिपाठी या पहिल्या 3 फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. या तिघांनी अनुक्रमे 2, 5 आणि 5 धावा केल्या. कॅप्टन हार्दिक पंड्या 12 रन्स करुन माघारी परतला. दीपक हुड्डा 9 रन्सवर आऊट झाला. त्यामुळे टीम इंडिया अडचणीत सापडली. मात्र त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि अक्षर पटेल या दोघांनी श्रीलंकेच्या गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला. दोघांनी ठोक ठोकला. मात्र ऐनवेळेस सूर्या 51 धावा करुन आऊट झाला. त्यानंतर हार्दिकची साथ द्यायला शिवम मावी आला. शिवम मावीने पण चांगला दम दाखवला. मावी सिक्स-फोर ठोकत होता. त्यामुळे विजयाच्या आशा पल्लवित झाल्या. पण टीम इंडियाला विजय मिळवण्यात यश आलं नाही.

दरम्यान आता श्रीलंकेने दुसरा सामना जिंकल्याने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 बरोबरी केली आहे. त्यामुळे आता 7 जानेवारीला होणाऱ्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात चांगलीच रंगत पहायला मिळणार आहे.

दुसऱ्या टी 20 साठी टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : हार्दिक पंड्या (कॅप्टन), शुबमन गिल, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, राहुल त्रिपाठी, दीपक हुड्डा, अक्षर पटेल, शिवम मावी, अर्शदीप सिंह, उमरान मलिक आणि युजवेंद्र चहल.

श्रीलंका प्लेईंग इलेव्हन : दासुन शानका (कर्णधार), पथुम निसांका, कुसल मेंडिस, धनंजया डिसिल्वा, चरित असालंका, भानुका राजपक्षे, वानिंदु हसारंगा, चामिका करुणारत्ने, महीष तीक्षणा, कासुन रजिता आणि दिलशान मधुशंका.