IND vs SL 1st ODI: कोहलीचा विषय निघताच का भडकला गौतम गंभीर? बोलून गेला मोठी गोष्ट

IND vs SL, 1st ODI Match: वर्षातील पहिलाच सामना खेळताना विराट कोहलीने शतक ठोकलं. विराटच्या शतकानंतर क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर बरोबर त्याची तुलना होणं स्वाभाविक आहे.

IND vs SL 1st ODI: कोहलीचा विषय निघताच का भडकला गौतम गंभीर? बोलून गेला मोठी गोष्ट
Virat kohli-Gautam gambhirImage Credit source: AFP
Follow us
| Updated on: Jan 11, 2023 | 12:27 PM

IND vs SL, 1st ODI Match: विराट कोहलीला टीम इंडियाच रन मशीन म्हटलं जातं. श्रीलंकेविरुद्ध पहिल्या वनडे मॅचमध्ये त्याने जबरदस्त बॅटिंग केली. वर्षातील पहिलाच सामना खेळताना विराट कोहलीने शतक ठोकलं. विराटच्या शतकानंतर क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर बरोबर त्याची तुलना होणं स्वाभाविक आहे. या मॅचमध्ये सुद्धा तसच झालं. कोहलीने सेंच्युरी झळकवताच कॉमेंट्री बॉक्सपासून सोशल मीडियापर्यंत त्याची सचिन तेंडुलकर बरोबर त्याची तुलना सुरु झाली. विराट लवकरच सचिनचा सर्वाधिक वनडे शतकांचा विक्रम मोडेल, अशी चर्चा लोकांमध्ये सुरु झाली. टीम इंडियाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरला ही चर्चा पटली नाही. विराटची सचिन बरोबर तुलना करण्याच्या विषयावर बोलताना तो भडकला.

गौतम गंभीरने विराटच्या खेळाच कौतुक केलं, पण….

गौतम गंभीरने विराटच्या खेळाच कौतुक केलं. पण तो म्हणाला, की, सचिनच्यावेळी धावा बनवणं जास्त कठीण होतं. कारण त्यावेळी फिल्डिंगचे नियम फलंदाजांना अनुकूल नव्हते. गौतम गंभीरने श्रीलंकन गोलंदाजांवर सुद्धा टीका केली. भारताविरुद्ध श्रीलंकेची ही खूप साधारण गोलंदाजी होती. त्यामुळे टीम इंडियाचा स्कोर 373 पर्यंत पोहोचला.

गंभीर काय बोलला?

श्रीलंकेची खूप सामान्य गोलंदाजी होती. टीम इंडियाच्या पहिल्या 3 बॅट्समननी भरपूर धावा केल्या. रोहित, कोहली आणि शुभमन यांच्यामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इतक्या धावा बनवण्याची क्षमता आहे. हे खूप सोपं होतं. आज रोहित आणि शुभमन धावा बनवत होते. ही माझ्यासाठी आश्चर्याची बाब आहे. तुम्हाला सतत धावा कराव्या लागतील. श्रीलंकेची गोलंदाजी खूप निराशाजनक होती. विराट फक्त चार सेंच्युरी लांब

या मॅचमध्ये विराट कोहलीने आपल्या करीयरमधील 45 वी सेंच्युरी झळकवली. त्याच हे सलग दुसरं वनडे शतक आहे. मागच्या महिन्यात बांग्लादेश विरुद्ध चटोग्राममध्ये त्याने शतक झळकवल होतं. वनडे क्रिकेटमध्ये एकूण शतकांच्या बाबतीत कोहली सचिन तेंडुलकरपासून फक्त चार सेंच्युरी लांब आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.