IND vs SL: Arshdeep Singh चं टेन्शन वाढलं, ‘हा’ घातक गोलंदाज परतल्याने वनडेमधून पत्ता होणार कट

| Updated on: Jan 09, 2023 | 7:29 AM

IND vs SL: टीम इंडिया आणि श्रीलंकेमधील वनडे सीरीजसाठी एक घातक गोलंदाज टीममध्ये पुनरागमन करणार आहे. 'या' प्लेयरमुळे अर्शदीप सिंहचा प्लेइंग 11 मधून पत्ता कट होऊ शकतो.

IND vs SL: Arshdeep Singh चं टेन्शन वाढलं, हा घातक गोलंदाज परतल्याने वनडेमधून पत्ता होणार कट
Arshdeep singh
Image Credit source: AFP
Follow us on

IND vs SL 1st ODI Match: टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध T20 सीरीज 2-1 अशी जिंकली. आता श्रीलंकेविरुद्ध वनडे सीरीज सुरु होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली ही वनडे सीरीज खेळली जाईल. वनडे सीरीजमध्ये एक घातक गोलंदाज टीम इंडियात पुनरागमन करणार आहे. दुखापतीमुळे हा खेळाडू टीम बाहेर होता. आता वनडे सीरीजमध्ये हा खेळाडू गोलंदाजी करताना दिसेल. या गोलंदाजाच्या पुनरागमनामुळे युवा बॉलर अर्शदीप सिंहच टेन्शन वाढणार आहे. या गोलंदाजामुळे अर्शदीपला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळणार नाहीय.

‘हा’ खेळाडू घेणार अर्शदीप सिंहची जागा

दोन्ही टीम्समध्ये खेळल्या जाणाऱ्या वनडे सीरीजसाठी सीनियर गोलंदाज मोहम्मद शमी टीममध्ये पुनरागमन करणार आहे. त्याचा वनडे स्क्वॉडमध्ये समावेश करण्यात आलाय. मोहम्मद शमी खांद्याच्या दुखापतीमुळे टीमच्या बाहेर होता. टी 20 वर्ल्ड कप 2022 नंतर एका ट्रेनिंग सेशन दरम्यान शमीला दुखापत झाली होती. या सीरीजसाठी जसप्रीत बुमराह सुद्धा टीममध्ये पुनरागमन करणार आहे. या दोन्ही दिग्गज गोलंदाजांना रोहित शर्माची पहिली पसंती असेल.

अर्शदीप किती वनडे खेळलाय?

श्रीलंकेविरुद्ध T20 सीरीजच्या दुसऱ्या सामन्यात अर्शदीप सिंह पूर्णपणे फ्लॉप ठरला होता. त्याने या मॅचमध्ये 2 ओव्हर्समध्ये 5 नो बॉल टाकले होते. त्यामुळे 18.50 च्या इकॉनमीने त्याने 37 धावा दिल्या. तिसऱ्या T20 मध्ये अर्शदीपने कमबॅक केलं. त्याने 20 धावा देऊन तीन विकेट काढल्या. 23 वर्षाचा अर्शदीप टीम इंडियासाठी आतापर्यंत 3 वनडे सामने खेळलाय. अजूनपर्यंत वनडे मॅचमध्ये त्याला एकही विकेट मिळालेला नाही.

अर्शदीपची जागा घेणाऱ्या बॉलरची कामगिरी कशी आहे?

मोहम्मद शमी टी 20 वर्ल्ड कप 2022 नंतर पहिल्यांदा टीम इंडियात खेळताना दिसणार आहे. शमी टीम इंडियासाठी 60 टेस्ट, 82 वनडे आणि 23 टी 20 सामने खेळलाय. टेस्टमध्ये त्याच्या नावावर 216 विकेट, वनडेमध्ये 152 विकेट आणि टी 20 मध्ये 24 विकेट काढल्यात. मोहम्मद शमी जुलै 2022 पासून टीम इंडियासाठी एकही वनडे मॅच खेळलेला नाही.

वनडे सीरीजसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा, (कॅप्टन) हार्दिक पांड्या, विराट कोहली, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, श्रेयस अय्यर, इशान किशन, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, उमरान मलिक, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह.