
टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका वूमन्स यांच्यात 5 टी 20i सामन्यांची मालिका खेळवण्यात येत आहे. टीम इंडियाने या मालिकेत विजयी सुरुवात केली आहे. टीम इंडियाने रविवारी 21 डिसेंबरला पहिल्या टी 20i सामन्यात श्रीलंकेवर 8 विकेट्सने मात केली. त्यानंतर आता उभयसंघातील दुसऱ्या सामन्याचं आयोजन आज 23 डिसेंबरला विशाखापट्टणममधील एसीए-व्हीडीसीए स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. टीम इंडियाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आहे.
भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर हीने फिल्डिंगचा निर्णय घेत श्रीलंकेला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं आहे. टीम इंडियाने या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये एकमेव पण सर्वात मोठा बदल केला आहे. आयसीसी रँकिंगमधील नंबर ऑलराउंडर दीप्ती शर्मा हीला बाहेर व्हावं लागलं आहे. दीप्तीला बरं वाटत नसल्याने तिला विश्रांती देण्यात आली आहे. तर दीप्तीच्या जागी स्नेह राणा हीचा समावेश करण्यात आला आहे. तर दुसऱ्या बाजूला श्रीलंकेने प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही.
टीम इंडियाची विशाखापट्टणममध्ये निराशाजनक कामगिरी राहिली आहे. टीम इंडियाने या मैदानात 7 टी 20i सामने खेळले आहेत. टीम इंडियाला त्यापैकी फक्त 2 सामनेच जिंकता आले आहेत. तर 5 वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे.
दरम्यान वूमन्स टीम इंडिया टी 20i क्रिकेटमध्ये श्रीलंकेवर वरचढ राहिली आहे. इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात आतापर्यंत एकूण 27 टी 20i सामने खेळवण्यात आले आहेत. भारताने त्यापैकी 21 सामने जिंकले आहेत. तर श्रीलंकेला 5 सामन्यात यश आलं आहे. तर एका सामन्याचा निकाला लागला नाही.
कॅप्टन हरमनप्रीत टॉसनंतर काय म्हणाली?
🚨 Toss 🚨#TeamIndia have won the toss and elected to field first.
Updates ▶️ https://t.co/Umn9ZGAexw#INDvSL | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/36fVVc4iQW
— BCCI Women (@BCCIWomen) December 23, 2025
वूमन्स टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : स्मृती मंधाना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कॅप्टन), रिचा घोष (विकेटकीपर), अमनजोत कौर, स्नेह राणा, अरुंधती रेड्डी, वैष्णवी शर्मा, क्रांती गौड आणि श्री चरणी.
श्रीलंका वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : विश्मी गुणरत्ने, चमारी अथापथु (कर्णधार), हसिनी परेरा, हर्षिता समरविक्रमा, निलाक्षी डी सिल्वा, कविशा दिलहारी, कौशली नुथ्यांगना (विकेटकीपर), मलकी मदारा, इनोका रणवीरा, काव्या कविंदी आणि शशिनी गिम्हनी.