IND vs SLCXI: सराव सामन्याचा दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, भारत 6 धावांनी पिछाडीवर! नेमकं काय घडलं?

भारत आणि श्रीलंका क्रिकेट इलेव्हन यांच्यात सराव सामना सुरू आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताने जोरदार कमबॅक केलं. या सामन्यात भारत अजूनही 6 धावांनी पिछाडीवर आहे.

IND vs SLCXI: सराव सामन्याचा दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, भारत 6 धावांनी पिछाडीवर! नेमकं काय घडलं?
IND vs SLCXI: सराव सामन्याचा दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, भारत 6 धावांनी पिछाडीवर! नेमकं काय घडलं?
Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Aug 08, 2026 | 6:55 PM

भारत आणि श्रीलंका क्रिकेट इलेव्हन यांच्यात सराव सामन्याच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाने पकड मिळवली. श्रीलंकेने पहिल्या दिवशी 8 गडी गमवून 363 धावा केल्या होत्या. तसेच डाव घोषित केल्याने दुसऱ्या दिवशी भारताला फलंदाजीची संधी मिळाली होती. भारताने दुसऱ्या दिवसावर जोरदार पकड मिळवली. भारताने दुसऱ्या दिवशी 90 षटकांचा सामना केला आणि 6 गडी गमवून 357 धावा केल्या आहे. भारतीय संघ अजूनही 6 धावांनी पिछाडीवर आहे. तिसऱ्या आणि शेवटच्या भारतीय संघ आरामात या 6 धावा पूर्ण आघाडी घेईल यात शंका नाही. या सामन्यात देवदत्त पडिक्कल आणि रवींद्र जडेजाची खेळी महत्त्वाची ठरली. या दोघांनी जबरदस्त खेळी टीम इंडियाला संकटातून बाहेर काढलं आहे.

भारताचा डाव

श्रीलंकेने केलेल्या 363 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरूवात काही चांगली झाली नाही. डावखुरा फलंदाज यशस्वी जयस्वाल याला खातंही खोलता आलं नाही. त्यामुळे भारतीय संघ बॅकफूटवर गेला होता. पण केएल राहुल आणि देवदत्त पडिक्कल यांनी डाव सावरला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 96 धावांची भागीदारी केली. केएल राहुल 40 धावा करून बाद झाला. त्यानंतर देवदत्त पडिक्कल आणि रवींद्र जडेजा यांनी डाव पुढे नेला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 72 धावांची भागीदारी केली. देवदत्त पडिक्कल शतकी खेळी केल्यानंतर रिटायर्ड हर्ट झाला. पण ध्रुव जुरेल आणि ऋषभ पंत स्वस्तात बाद झाले.

रवींद्र जडेजाने मानव सुथारसोबत डाव सावरला. या दोघांनी 76 धावांची भागीदारी केली. ही भागीदारी जमली असताना रवींद्र जडेजा 63 धावांवर रिटायर्ड हर्ट झाला. त्यानंतर कुलदीप यादव आला आणि 1 धाव करून रिटायर्ड हर्ट झाला. तर मोहम्मद सिराज 1 धावेवर बाद झाला. त्यानंतर देवदत्त पडिक्कल पुन्हा मैदानात उतरला आणि सारांश जैनसोबत 49 धावांची भागीदारी केली. सारांश जैनने 45 चेंडूत 22 धावांची खेळी केली आणि रिटायर्ड हर्ट होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर गुरनूर ब्रार आणि देवदत्त पडिक्कल यांची जोडी जमली. या दोघांनी दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 30 चेंडूत नाबाद 50 धावा केल्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us