IND vs WI : पहिल्या 5 चेंडूत 2 DRS, दोन्ही सक्सेसफुल, पण फायदा टीम इंडियालाच! नेमकं घडलं काय?

| Updated on: Feb 20, 2022 | 10:22 PM

, 185 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडिजची सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्याच षटकात विंडीजने विकेट गमावली आहे. या पहिल्या षटकातील सुरुवातीच्या 5 चेंडूत दोन वेळा डीआरएस (Decision Review System) पाहायला मिळाला.

IND vs WI : पहिल्या 5 चेंडूत 2 DRS, दोन्ही सक्सेसफुल, पण फायदा टीम इंडियालाच! नेमकं घडलं काय?
Team India
Follow us on

मुंबई : भारत आणि वेस्ट इंडिज (INDvsWI) यांच्यात आज शेवटचा तिसरा टी-20 सामना खेळवला जाणार आहे. भारताने टी-20 मालिकेत आधीच 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आजचा सामना भारताच्या दृष्टीने औपचारिकता आहे. पण वेस्ट इंडिज आजचा सामना जिंकून किमान प्रतिष्ठा राखण्याचा प्रयत्न करेल. वनडे सीरीजप्रमाणे टी-20 मध्येही क्लीन स्वीप करण्याचा भारताचा प्रयत्न असेल. आजच्या सामन्यात नाणेफेक जिंकून कायरन पोलार्डने (Kieron Pollard) प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कर्णधाराचा हा निर्णय विंडीच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. तिसऱ्याच षटकात भारताने ऋतुराज गायकवाडची (4) विकेट गमावली. त्यानंतर 9.4 षटकात भारताची 3 बाद 66 अशी अवस्था झाली होती. मात्र पुढे सूर्यकुमार यादव आणि वेंकटेश अय्यरने भारताचा डाव सावरला. सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) 31 चेंडूत 65 धावांची धडाकेबाज अर्धशतकी खेळी केली. त्यात 7 षटकार आणि एका चौकाराचा समावेश होता. तर वेंकटेशने 19 चेंडूत 35 धावा करत त्याला चांगली साथ दिली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 41 चेंडूत 91 धावांची भागीदारी करत भारताला 184 धावांपर्यंत मजल मारुन दिली.

पाच चेंडूत दोन डीआरएस

दरम्यान, 185 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडिजची सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्याच षटकात विंडीजने विकेट गमावली आहे. या पहिल्या षटकातील सुरुवातीच्या 5 चेंडूत दोन वेळा डीआरएस (Decision Review System) पाहायला मिळाला. षटकातील तिसरा चेंडू काईल मेअर्सच्या पॅडवर जाऊन आदळला. पंचांनी बोट वर करुन मेअर्सला बाद घोषित केला. मात्र मेअर्सने डीआरएस घेतला. त्यानंतर तिसऱ्या पंचांनी मैदानातील पंचांना निर्णय मागे घेण्यास सांगितले. त्यानंतर पाचवा चेंडू काईल मेअर्सच्या बॅटला लागून यष्टीरक्षक इशान किशनच्या ग्लोव्हजमध्ये जाऊन विसावला. मात्र पंचांनी नकारार्थी मान डोलावली. मात्र भारतीय कर्णधार रोहित शर्मा, यष्टीरक्षक आणि दीपक चाहर तिघांनाही विश्वास होता की, चेंडू बॅटला लागला आहे. त्यामुळे रोहितने क्षणाचाही विलंब न करता डीआरएस घेतला. त्यानंतर तिसऱ्या पंचांनी मैदानातील पंचांना आपला निर्णय मागे घ्यायला लावत मेअर्सला बाद घोषित करण्यास सांगितले.

ऋतुराज गायकवाडला संधी

भारताने दुसऱ्या टी-20 सामन्यात संघात कोणतेही बदल केले नव्हते. पण मालिकेत विजयी आघाडी घेतल्यामुळे आता तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाने चार बदल केले आहेत. आज महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडला संघात संधी देण्यात आली. स्थानिक क्रिकेट स्पर्धा आणि मागच्या आयपीएल सीजनमध्ये सर्वाधिक धावा करुनही ऋतुराजला संधी मिळत नव्हती. गेले दोन तीन महिने तो बेंचवर बसून होता. अखेर आज त्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली. कर्णधार रोहित शर्माने ऋतुराजसाठी स्वतः खालच्या क्रमांकावर फलंदाजी केली आणि त्याला सलामीला संधी दिली. मात्र ऋतुराज या संधीचं सोन करु शकला नाही. तो 8 चेंडूत 4 धावा करुन बाद झाला.

आवेश खानचं पदार्पण

गोलंदाजांमध्ये आजच्या सामन्यात आवेश खान आणि शार्दुल ठाकूर या दोन खेळाडूंना संधी मिळाली आहे. दुसऱ्या सामन्यात शार्दुलला विश्रांती देण्यात आली होती. सातत्याने क्रिकेट खेळत असलेल्या भुवनेश्वर कुमार आणि युजवेंद्र चहलला विश्रांती देऊन आवेश खान आणि शार्दुल ठाकूर या दोन वेगवान गोलंदाजांना आज प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालं आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करणारा वेगवान गोलंदाज आवेश खान आजच्या सामन्याद्वारे टीम इंडियात पदार्पण करत आहे.

इतर बातम्या

IND vs WI : बडे दिलवाला! ऋतुराजसाठी हिटमॅन ‘वन-डाऊन’ येणार, आवेश खानचं पदार्पण

पैसे दिले नाहीत, जेम्स फॉकनरने पाकिस्तानची PSL लीग अर्ध्यावरच सोडली, हॉटेलमध्ये झुंबरवर बॅट, हेल्मेट फेकलं

Ranji Trophy सामन्यात 165 धावा, हनुमा विहारीने टीम इंडियासमोरील सर्वात मोठ्या प्रश्नाचं उत्तर दिलं