IND vs WI Paying XI: राहुलचं टीम इंडियात कमबॅक, धडाकेबाज खेळाडू संघाबाहेर, कर्णधार कायरन पोलार्डला विश्रांती

वेस्ट इंडिजचा कर्णधार निकोलस पूरनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. वेस्ट इंडिज भारताला तगडी लढत देऊन मालिकेतं आव्हान जिवंत ठेवणार की, भारत मालिका जिंकणार याचा निकाल आजच्याच सामन्यात लागेल.

IND vs WI Paying XI: राहुलचं टीम इंडियात कमबॅक, धडाकेबाज खेळाडू संघाबाहेर, कर्णधार कायरन पोलार्डला विश्रांती
IND vs WI (PC : BCCI Twitter)
| Updated on: Feb 09, 2022 | 1:41 PM

मुंबई : भारत आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यातील मायदेशाल खेळवल्या जात असलेल्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्याला (2nd ODI) सुरुवात झाली आहे. वेस्ट इंडिजचा कर्णधार निकोलस पूरनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. वेस्ट इंडिज भारताला तगडी लढत देऊन मालिकेतं आव्हान जिवंत ठेवणार की, भारत मालिका जिंकणार याचा निकाल आजच्याच सामन्यात लागेल. वास्तविक 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ 1-0 ने पुढे आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) खेळवलेला पहिला एकदिवसीय सामना भारताने 6 गडी राखून जिंकला होता. अशा परिस्थितीत आता त्याच मैदानावर सुरु असलेली दुसरी वनडेही भारताने जिंकली, तर मालिकेवर टीम इंडियाचाच ताबा असेल. मात्र, वेस्ट इंडिज संघाला ते अजिबात परवडणार नाही. त्यामुळे मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी वेस्ट इंडिजचा संघ आज पलटवार करण्याच्या इराद्याने मैदानात उतरला आहे.

दरम्यान, दोन्ही संघांनी आपापल्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल केला आहे. उपकर्णधार केएल राहुल संघात परतल्यामुळे आक्रमक फलंदाज इशान किशनला बाहेर बसण्यात आलं आहे. पहिल्या वनडेमध्ये त्याने 28 धावा केल्या होत्या. भारताने संघात फक्त हा एकमेव बदल केला आहे. तर वेस्ट इंडिजचा संघ नियमित कर्णधार कायरन पोलार्डशिवाय मैदानात उतरला आहे. त्याच्या जागी निकोलस पूरन संघाचं नेतृत्व करत आहे.

केएल राहुल गेल्या दोन वर्षांपासून एकदिवसीय क्रिकेटमध्ये मधळ्या फळीत फलंदीज करत आहे. परंतु आज त्याला सलामीवीर म्हणून संधी दिली जाईल. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी शिखर धवन फिट होऊन संघात परतला आहे. परंतु संघ व्यवस्थापनाने त्याला लगेच मैदानात उतरवण्याची घाई केली नाही. कदाचित त्याला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात संधी दिली जाऊ शकते. तसेच श्रेयस अय्यरदेखील पूर्णपणे फिट आहे.

असा आहे भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, वॉशिंगटन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल, प्रसिद्ध कृष्णा.

असा आहे वेस्ट इंडीजचा संघ

निकोलस पूरन (कर्णधार), शाई होप (यष्टीरक्षक), ब्रँडन किंग, डॅरेन ब्रावो, शारमाह ब्रूक्स, जेसन होल्डर, ओडेन स्मिथ, फाबियान एलन, अकील हुसैन, अल्जारी जोसेफ, केमार रोच.

वेस्ट इंडीज प्लेईंग इलेव्हन

इतर बातम्या

Under 19 World cup: ‘हे’ आहेत वर्ल्डकप गाजवणारे महाराष्ट्राचे चार खेळाडू, गरज असताना मुंबई-पुणेकरांचा जबरदस्त परफॉर्मन्स

IND vs WI: सुर्य कुमार यादवला भडकवणारा तो जोडीदार कोण? मागच्या मॅचमध्ये काय झालं?

तालिबानची दहशत! अफगाणिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ, U19 World Cup टीममधले चौघे मायदेशी परतलेच नाहीत