AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs WI, 1st T20I, LIVE Streaming: कधी आणि कुठे पाहता येईल भारत-वेस्ट इंडिजमधला दुसरा टी-20 सामना

भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये आज दुसरा टी 20 सामना होणार आहे. बुधवारी झालेल्या पहिल्या टी 20 सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर सहागडी राखून सहज विजय मिळवला होता.

IND vs WI, 1st T20I, LIVE Streaming: कधी आणि कुठे पाहता येईल भारत-वेस्ट इंडिजमधला दुसरा टी-20 सामना
| Updated on: Feb 18, 2022 | 9:26 AM
Share

कोलकाता: भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये (India vs west indies) आज दुसरा टी 20 सामना ( Second T 20 match) होणार आहे. बुधवारी झालेल्या पहिल्या टी 20 सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर सहागडी राखून सहज विजय मिळवला होता. या विजयासह भारताने तीन टी 20 सामन्यात मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आजचा सामना जिंकून भारत मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेऊ शकतो. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि रवी बिश्नोई यांच्या बळावर भारताने पहिल्या टी 20 सामन्यात विजय मिळवला होता. टी 20 मध्ये पदापर्ण करणाऱ्या रवी बिश्नोईने चार षटकात 17 धावा देऊन दोन विकेट घेतल्या होत्या, तर रोहित शर्माने 19 चेंडूत 40 धावा तडकावल्या होत्या. रोहितने इशान किशनसोबत 64 धावांची भागीदारी करुन विजयाचा पाया रचला होता.

कोरोनामुळ कोलकात्याच्या इडन गार्डन्स स्टेडियमवर तिन्ही टी 20 चे सामने खेळवण्यात येणार आहेत. टी 20 मालिकेतही भारताने विजयी सातत्य कायम ठेवलं आहे. याआधी झालेल्या एकदिवसीय मालिकेत भारताने क्लीन स्वीप केलं होतं. भारताने वनडे सीरीज 3-0 अशी जिंकली होती. वेस्ट इंडिज विरुद्धच्या या सीरीजच्या निमित्ताने भारत आपल्या संघात अनेक बदल करुन पाहत आहे. नव्या खेळाडूंना संधी दिली जात आहे. आजच्या सामन्यात कोणाला संधी मिळणार? रोहित शर्मा विजयी संघच कायम ठेवणार का? या प्रश्नांची उत्तरे मिळतील.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा T20 सामना कधी खेळवला जाईल? भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा T20 सामना 18 फेब्रुवारी (शुक्रवारी) रोजी खेळवला जाणार आहे.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा T20 सामना कुठे खेळवला जाईल? भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा T20 सामना कधी सुरू होईल? भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील हा सामना संध्याकाळी 07.30 वाजता सुरू होईल, तर नाणेफेक संध्याकाळी 7 वाजता होईल.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या T20 सामन्याचे थेट प्रक्षेपण तुम्ही कोठे पाहू शकता? भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या वाहिन्यांवर वेगवेगळ्या भाषांमध्ये पाहता येईल.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या T20 सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग मी कुठे पाहू शकतो? सबस्क्रिप्शनसह हॉटस्टार या ओटीटी अॅपवर सामन्याचे ऑनलाइन लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल. याशिवाय tv9marathi.com वरही सामन्याचे लाईव्ह अपडेट्स वाचता येतील.

ind vs wi 2nd T 20 live streaming know when and where to watch india vs west indies T 20 match

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.