IND vs WI : विंडीजचा पाचव्या दिवशी होणार सुपडा साफ, टीम इंडियाला फक्त 58 धावांची गरज

India vs West Indies 2nd Test Day 4 Stumps and Highlights : विंडीजने विजयासाठी दिलेल्या 121 धावांचा पाठलाग करताना भारताने 1 विकेट गमावून 63 रन्स केल्या आहेत. टीम इंडिया या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे.

IND vs WI : विंडीजचा पाचव्या दिवशी होणार सुपडा साफ, टीम इंडियाला फक्त 58 धावांची गरज
Sai Sudharsan and KL Rahul
Image Credit source: Bcci
Updated on: Oct 13, 2025 | 7:41 PM

टीम इंडिया वेस्ट इंडिज विरूद्धच्या दुसरा आणि अंतिम कसोटी सामना जिंकण्यापासून फक्त 54 धावांनी दूर आहे. उभयसंघातील सामना हा दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. विंडीजने या सामन्यातील चौथ्या दिवशी भारताला 121 धावांचं आव्हान दिलं. भारताने 121 धावांचा पाठलाग करताना दिवसाचा खेळ संपेपर्यंत 1 विकेट गमावून 63 धावा केल्या आहेत. त्यामुळे आता पाचव्या दिवशी फक्त 54 धावांचीच गरज आहे. टीम इंडिया या विजयासह विंडीजचा या मालिकेत 2-0 ने धुव्वा उडवणार आहे.

चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा साई सुदर्शन आणि केएल राहुली ही जोडी नाबाद परतली. साई 30 आणि केएल 25 धावांवर नाबाद परतले. तर टीम इंडियाने यशस्वी जैस्वाल याच्या रुपात एकमेव विकेट गमावली. यशस्वीने 8 धावा केल्या.

विंडीजचा दुसरा डाव

भारताने पहिला डाव हा 518 धावांवर घोषित केला. त्यानंतर भारताने विंडीजला पहिल्या डावात 248 वर ऑलआऊट केलं आणि फॉलोऑन दिला. विंडीजने चौथ्या दिवशी एकूण 8 विकेट्सच्या मोबदल्यात आणखी 220 धावा जोडल्या. या 220 पैकी 79 धावा या शेवटच्या जोडीने जोडल्या. जेडन सील्स आणि जस्टीन ग्रेव्हस या जोडीने दहाव्या विकेटसाठी 79 रन्सची पार्टनरशीप केली. त्यामुळे विंडीजला दुसऱ्या डावात 390 धावांपर्यंत मजल मारता आली.

चौथा दिवस आणि विंडीजची बॅटिंग

विंडीजने 2 आऊट 170 पासून चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. शाई होप आणि जॉन कँपबेल या जोडीने 135 धावांच्या भागीदारीला पुढे नेण्याची सुरुवात केली. कँपबेल आणि होप या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 177 धावांची भागीदारी केली. कँपबेल आऊट होताच 177 रन्सच्या पार्टनरशीपचा शेवट झाला. तसेच जॉन कँपबेल याने 115 धावा केल्या. कँपबेलच्या रुपात विंडीजने तिसरी विकेट गमावली. त्यानंतर शाईने शतक झळकावलं. होपचं हे कारकीर्दीतील तिसरं शतक ठरलं. मात्र होप 103 धावांवर बाद झाला. होप आऊट झाल्याने विंडीजचा स्कोअर 4 आऊट 271 असा झाला.

त्यानंतर टीम इंडियाने विंडीजला झटपट झटके दिले. भारताने विंडीजला 40 धावांच्या मोबदल्यात 5 झटके दिले. त्यामुळे विंडीजची स्थिती 9 आऊट 311 अशी झाली. त्यानंतर सील्स आणि ग्रेव्हस या जोडीने दहाव्या विकेटसाठी 79 रन्सची पार्टनरशीप केली. त्यामुळे विंडीजला 120 धावांची आघाडी घेता आली. विंडीजवर एक वेळ डावाने पराभूत होण्याचा धोका होता. मात्र विंडीजच्या फलंदाजांनी चिवट प्रतिकार केला आणि टीम इंडियाला दुसऱ्या डावात बॅटिंगसाठी भाग पाडलं.

टीम इंडिया सलग दुसऱ्या विजयाच्या उंबरठ्यावर

टीम इंडियाची बॅटिंग

यशस्वी जैस्वाल याने फटकेबाजीच्या नादात आपली विकेट गमावली. भारताने यशस्वीच्या रुपात 9 धावांवर पहिली विकेट गमावली. यशस्वी 8 रन्सवर आऊट झाला. त्यानंतर केएल राहुल आणि साई सुदर्शन या जोडीने दिवसाचा खेळ संपेपर्यंत 54 धावांची नाबाद भागीदारी केली. केएल 25 आणि साई 30 धावांवर नाबाद परतले.