AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND Vs WI T20 : तिलक वर्मा याची डेब्यू मॅचमध्ये सलग सिक्स मारत करिअरची सुरूवात, पाहा Video

Tilak Varma Six : कर्णधार हार्दिक पंड्याने तिलक वर्माला डेब्यू कॅप दिली होती. आपला पहिला सामना कायम सर्वांच्या लक्षात राहिल अशी खेळी तिलक वर्माने केली. मात्र संघाला तो विजय मिळवून देऊ शकला नाही.

IND Vs WI T20 : तिलक वर्मा याची डेब्यू मॅचमध्ये सलग सिक्स मारत करिअरची सुरूवात, पाहा Video
| Updated on: Aug 04, 2023 | 8:47 AM
Share

मुंबई : टीम इंडिया आणि वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यामध्ये टीम इंडियाचा पराभव झाला आहे. अटीतटीच्या झालेल्या लढतीमध्ये टीम इंडियाने 4 धावांनी सामना गमावला. प्रमुख फलंदाज अपयशी ठरल्याने कॅरेबियन संघाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यात टीम इंडियाचा संघ कमी पडला. या सामन्यामध्ये पदार्पणवीर  तिलक वर्माने सर्वांचं लक्ष वेधलं. पठ्ठ्याने पहिल्याच सामन्यात आपल्या इनिंगची सुरूवात एक नाहीतर दोन षटकारांनी केली.

सलग दोन षटकारांनी करिअरला सुरूवात

संघाच्या दोन विकेट्स गेल्या असताना तिलक वर्मा फलंदाजीला आला होता. पहिला चेंडू निर्धाव खेळला मात्र पुढील दोन चेंडूंवर त्याने सलग दोन षटकार मारत आंतरराष्ट्रीय करिअरची सुरूवात केली. 20 वर्षीय तिलक वर्माने अल्जारी जोसेफला षटकार मारले. तिलकने 22 चेंडूंमध्ये 39 धावा केल्या यामध्ये त्याने 2 चौकार आणि 3 षटकार मारले.

तिलक वर्माच्या षटकारांने सूर्याची आठवण

सूर्यकुमार यादवनेही टी-20 करिअरची सुरूवात षटकार मारत केली. इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात त्याने जोफ्रा आर्चरला षटकार मारत आपल्या टी-20 करिअरची सुरूवात केलेली. तिलक वर्माने मारलेल्या दोन षटकारांनी सर्वांना सूर्याकुमारच्या पहिल्या षटकाराची आठवण झाली.

पाहा व्हिडीओ-

सामन्याचा धावता आढावा

वेस्ट इंडिज संघाने प्रथम फलंदाजी करताना 149-6 धावा केल्या होत्या. यामध्ये निकोलस पूरन 41 धावा आणि रोवमॅन पावेल 48 धावा दोघांनी महत्त्वाची खेळी केली. अर्शदीप सिंग आणि युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंंडियाला 20 षटकांमध्ये  145 धावा करता आल्या. पाच सामन्यांच्या मालिकेत आता वेस्ट इंडिज संघाने 1-0 ने आघाडी घेतली आहे.

वेस्ट इंडिज प्लेईंग इलेव्हन | रोवमॅन पावेल (कॅप्टन), ब्रँडन किंग, कायल मेयर्स, जॉनसन चार्ल्स (विकेटकीपर), निकोलस पूरन, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, रोमारियो शेफर्ड, अकील होसैन, अल्जारी जोसेफ आणि ओबेड मॅकॉय

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | हार्दिक पंड्या (कॅप्टन), शुबमन गिल, ईशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, संजू सॅमसन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह आणि मुकेश कुमार.

तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.