IND vs WI: सुर्य कुमार यादवला भडकवणारा तो जोडीदार कोण? मागच्या मॅचमध्ये काय झालं?

| Updated on: Feb 07, 2022 | 10:16 PM

सूर्यकुमार यादव आणि वेस्ट इंडिजचा कर्णधार कियारन पोलार्ड यांच्यात काही स्लेजिंग झाल्याचेही दिसून आहे. सामन्यानंतर सूर्यकुमारने त्यामागचे कारण सांगितले. सूर्यकुमार यादवने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात नाबाद 34 धावा केल्या आणि दीपक हुडासोबत 62 धावांची भागीदारी करून संघाला विजय मिळवून दिला.

IND vs WI: सुर्य कुमार यादवला भडकवणारा तो जोडीदार कोण? मागच्या मॅचमध्ये काय झालं?
मॅचदरम्यान झालेल्या स्लेजिंगचा किस्सा
Follow us on

मुंबई : भारतीय संघाने रविवारी वेस्ट इंडिजविरुद्धचा (Ind Vs Wi) पहिला एकदिवसीय सामना जिंकला. दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर टीम इंडियासाठी (Team India) हा विजय खूप महत्त्वाचा होता. संघाच्या विजयात कर्णधार रोहित शर्माशिवाय (Rohit Sharma) सूर्यकुमार यादव आणि दीपक हुडा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सामन्यादरम्यान सूर्यकुमार यादव आणि वेस्ट इंडिजचा कर्णधार कियारन पोलार्ड यांच्यात काही स्लेजिंग झाल्याचेही दिसून आहे.. सामन्यानंतर सूर्यकुमारने त्यामागचे कारण सांगितले. सूर्यकुमार यादवने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात नाबाद 34 धावा केल्या आणि दीपक हुडासोबत 62 धावांची भागीदारी करून संघाला विजय मिळवून दिला. दीपक हुडानेही या सामन्यात 26 धावांची नाबाद खेळी खेळली. सामन्यादरम्यान पोलार्डने सूर्यकुमारला भडकावण्याचाही प्रयत्न केला, तरीही त्याने त्याकडे लक्ष दिले नाही. अनेकदा खेळाडुंचे लक्ष खेळापासून विचलीत करण्यासाठी असे अनेक प्रकार क्रिकिटमध्ये घडत असतात.

सामन्यादरम्यान काय घडलं?

सूर्य कुमार म्हणाला, मिडविकेट ओपन आहे, तुम्ही आयपीएलसारखे फ्लिक शॉट्स का दाखवत नाही, म्हणत त्याने मला भरकटवण्याचा प्रयत्न केला. मी त्या गोष्टींकडे लक्ष दिले नाही, कारण मला शेवटपर्यंत टिकून राहायचे होते. आयपीएल मध्ये किरन पोलार्ड आणि सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सकडून एकत्र खेळतात. दोन्ही खेळाडू आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्स साठी एकत्र खेळताना देखील दिसणार आहेत कारण मुंबईने या दोन्ही खेळाडूंना कायम ठेवले आहे. दीपक हुड्डासोबतच्या भागीदारी आणि गेम प्लॅनबद्दल बोलताना सूर्यकुमार म्हणाला, ‘मला वाटते की सर्वकाही पूर्णपणे स्पष्ट, त्यामुळे मी दीपक हुड्डाला काहीही करण्यास सांगितले नाही. गेल्या सात वर्षांपासून तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळत आहे. त्या वेळी आम्ही शेवटपर्यंत मैदानात राहणे महत्त्वाचे होते. त्याचा स्वतःवर विश्वास होता. मला वाटते की पिच दुपारच्या वेळी होतं तसेच होते, परंतु दव पडल्यामुळे धावांचा पाठलाग करणे आणखी सोपे झाले.

रोहित शर्मची सुरूवात विजयाने

वेस्ट इंडिजच्या 177 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली आणि 84 धावांवर पहिली विकेट पडली. त्यानंतर संघाने ठराविक अंतराने काही विकेट गमावल्या आणि धावसंख्या 116 वर 4 बाद झाली. येथून सूर्यकुमार यादव आणि हुडा यांनी डाव सांभाळला आणि पाचव्या विकेटसाठी 62 धावांची भागीदारी केली. या भागीदारीच्या जोरावर टीम इंडियाने विजय मिळवला.

तालिबानची दहशत! अफगाणिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ, U19 World Cup टीममधले चौघे मायदेशी परतलेच नाहीत

IPL 2022: हार्दिकच्या अहमदाबाद फ्रेंचायजीने संघाच्या नावाची केली घोषणा, काय ठेवलं नाव?

IPL 2022: विराट कोहलीने पुन्हा कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारावी, मराठमोळ्या अजित आगरकरांच मत