AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022: विराट कोहलीने पुन्हा कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारावी, मराठमोळ्या अजित आगरकरांच मत

भारताचा आघाडीचा फलंदाज विराट कोहलीने (Virat kohli) क्रिकेटच्या सर्वच फॉर्मेटमध्ये कर्णधारपद सोडलं आहे. टी-20 ची कॅप्टनशिप त्याने स्वत:हून सोडली.

IPL 2022: विराट कोहलीने पुन्हा कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारावी, मराठमोळ्या अजित आगरकरांच मत
virat-ajit
| Updated on: Feb 07, 2022 | 5:02 PM
Share

मुंबई: भारताचा आघाडीचा फलंदाज विराट कोहलीने (Virat kohli) क्रिकेटच्या सर्वच फॉर्मेटमध्ये कर्णधारपद सोडलं आहे. टी-20 ची कॅप्टनशिप त्याने स्वत:हून सोडली, तर वनडेच्या कर्णधारपदावरुन विराटला हटवण्यात आलं. कारण BCCI ला मर्यादीत षटकांच्या फॉर्मेटमध्ये दोन वेगवेगळे कर्णधार मान्य नव्हते. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेत 2-1 असा पराभव झाल्यानंतर विराटने तडकाफडकी कसोटी कर्णधारपदाचा राजीनाना दिला. विराट सध्या चांगल्या फॉर्ममध्ये नाहीय. फलंदाजीवर पूर्ण लक्ष केंद्रीत करण्यासाठी त्याने कर्णधारपद सोडल्याची शक्यता आहे. असं असताना भारताचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर यांनी विराटने पुन्हा एकदा IPL मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे कर्णधारपद स्वीकारावे, असं मत व्यक्त केलं आहे. विराटने इंडियन प्रिमियर लीगमध्ये कर्णधारपद पुन्हा स्वीकारल्यास RCB साठी बऱ्याच गोष्टी सोप्या होतील, असं अजित आगरकर यांना वाटतं.

कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली होती

विराटने मागच्यावर्षी आयपीएलच कर्णधारपद सोडलं. यूएईमध्ये आयपीएल स्पर्धेचा दुसरा टप्पा सुरु होण्याआधी विराटने आरसीबीचं कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली होती. विराटने 2013 मध्ये डॅनिअल व्हिटोरीकडून आयपीएलच्या कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली. विराटने 131 आयपीएल सामन्यांमध्ये आरसीबीचे नेतृत्व केलं. यात 60 सामन्यात विजय मिळाला, तर 64 सामन्यांमध्ये पराभव झाला. 2016 मध्ये एकदाच त्याच्या नेतृत्वाखाली आरसीबीचा संघ आयपीएलच्या फायनलमध्ये पोहोचला. पण त्याला एकदाही जेतेपदाची ट्रॉफी उंचावता आली नाही.

15 कोटी रुपये खर्चून रिटेन केलं

मेगा ऑक्शनआधी आरसीबीने विराटला 15 कोटी रुपये खर्चून रिटेन केलं आहे. बंगळुरुमध्ये 12 आणि 13 फेब्रुवारीला ऑक्शन पार पडणार आहे. आरसीबीने ग्लेन मॅक्सवेलला 11 कोटी तर मोहम्मद सिराजला सात कोटी रुपये मोजून रिटेन केलं आहे.

RCB ने अजून कर्णधाराच्या नावाची घोषणा केलेली नाही. ग्लेन मॅक्सवेलही कर्णधारपदाच्या शर्यतीत आहे. ऑक्शनमधून निवडलेल्या एखाद्या खेळाडूलाही आरसीबी कर्णधार बनवू शकते. श्रेयस अय्यरच नावही आरसीबीच्या कॅप्टनशिपसाठी चर्चेत आहे. “कोहलीने पुन्हा कॅप्टनशिप स्वीकारली, तर फ्रेंचायजीला एखाद्या खेळाडूसाठी मोठी रक्कम खर्च करण्याची आवश्यकता नाही” असं आगरकर म्हणाला.

IPL 2022 Virat Kohli taking over captaincy again will make things easy for RCB says Ajit Agarkar

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.