Yuzvendra Chahal: युजवेंद्र वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना का झेपला नाही? चहलने स्वत:च सांगितलं ‘सिक्रेट’

"दक्षिण आफ्रिका दौऱ्य़ातील मी माझ्य़ा गोलंदाजीचे व्हिडिओ पाहिले. त्यावेळी ज्या चूक केल्या, त्यातून शिकलो. धडा घेतला. अधिकाधिक गुगली चेंडू टाकण्याचं महत्त्व माझ्या लक्षात आलं.

Yuzvendra Chahal: युजवेंद्र वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना का झेपला नाही? चहलने स्वत:च सांगितलं 'सिक्रेट'
Rohit-chahal (BCCI PHOTO)
Follow us
| Updated on: Feb 07, 2022 | 12:59 PM

अहमदाबाद: वेस्ट इंडिज विरुद्ध (India vs West Indies) काल झालेल्या पहिल्या वनडेमध्ये युजवेंद्र चहल सर्वात प्रभावी गोलंदाज ठरला. मधल्याफळीला खेळपट्टिवर स्थिरावण्याची संधी न देता त्याने वेस्ट इंडिजच कंबरड मोडून टाकलं. चहलची (Yuzvendra Chahal) फिरकी गोलंदाजी खेळताना वेस्ट इंडिजचे फलंदाज चाचपडत होते. त्यांना चहलची गोलंदाजी झेपत नव्हती. सामन्यानंतर युजवेंद्र चहलने त्याच्या गोलंदाजीच सिक्रेट सांगितलं. “दक्षिण आफ्रिका दौऱ्य़ातील मी माझ्य़ा गोलंदाजीचे व्हिडिओ पाहिले. त्यावेळी ज्या चूक केल्या, त्यातून शिकलो. धडा घेतला. अधिकाधिक गुगली चेंडू टाकण्याचं महत्त्व माझ्या लक्षात आलं. ट्रेनिंग सेशनमध्ये कॅप्टन रोहित शर्माने (Rohit sharma) मला काही गोष्टी सांगितल्या. त्याने मला विचार करायला भाग पाडलं. रोहितने काही टिप्स दिल्या. वेस्ट इंडिज विरुद्धच्या वनडे मालिकेआधी गोलंदाजीमध्ये काही किरकोळ बदल सुचवले” असं चहलने सांगितलं.

‘गुगली चेंडू माझ्या लेगस्पिनला अधिक प्रभावी बनवतात, हे मला रोहित शर्माने पटवून दिलं’, असं चहलने सामन्यानंतर बोलताना सांगितलं. काल 1000 व्या वनडे मॅचमध्ये भारताने वेस्ट इंडिजवर सहा विकेट राखून विजय मिळवला. चार विकेट घेणाऱ्या युजवेंद्र चहलला सामनावीराच्या पुरस्कराने गौरवण्यात आले. पूरन, पोलार्ड सारख्या महत्त्वाच्या फलंदाजांना चहलने खेळपट्टिवर स्थिरावूच दिले नाही. हाच चहल दक्षिण आफ्रिकेत फ्लॉप ठरला होता.

करीयरमधल्या चढ-उतारांबद्दल बोलले

रोहित आणि चहल कॅमऱ्यासमोर एकत्र असताना तेव्हा मनोरंजन नक्की ठरलेलं असतं. पण रविवारी दोघेही लेग स्पिन गोलंदाजीची कला आणि करीयरमधल्या चढ-उतारांबद्दल बोलले. वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये मला चहलच्या गोलंदाजीमध्ये काही बदल पाहायला मिळाले. चहलवर याआधी टीका सुरु होती. चहलने त्याच्या पहिल्याच ओव्हरमध्ये दोन विकेट घेतल्या.

“सामन्याआधी तू मला गुगली चेंडूबद्दल सांगितलं होतं. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात मी हीच गोष्ट मिस केली. माझ्या मनात होतं. पण मी जास्त गुगली चेंडू टाकत नव्हतो. हार्ड हिटरला जेव्हा असे चेंडू दिसतात, तेव्हा ते मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतात. माझ्याकडे असलेलं हे शस्त्र आहे. लेग स्पिनरसाठी गुगली चेंडू खूप महत्त्वाचा आहे” असे चहलने बीसीसीआयसाठी रोहित शर्मासोबतच्या व्हिडिओ संवादाच्या कार्यक्रमात सांगतिलं.

संबंधित बातम्या: Ravi Kumar: ‘काय आतापासूनच तू…’ अंडर 19 वर्ल्डकपमधल्या मुलाने विचारलेल्या थेट भिडणाऱ्या प्रश्नावर विराटचं उत्तर Hrishikesh Kanitkar: …आणि अंडर 19 वर्ल्डकप विजेत्या संघाचे पुणेकर कोच कानिटकरांनी पाकिस्तानला दिला होता तडाखा IND vs WI: ‘मी संघातील सदस्यांना सांगिन की…’,पहिल्या विजयानंतर रोहित शर्मा म्हणाला….

captain Rohit Sharma’s inputs helped Yuzvendra Chahal realise importance of googlies India vs West Indies

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.