AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ravi Kumar: ‘काय आतापासूनच तू…’ अंडर 19 वर्ल्डकपमधल्या मुलाने विचारलेल्या थेट भिडणाऱ्या प्रश्नावर विराटचं उत्तर

“विराट कोहली तुमच्यासोबत खूप चांगला संवाद झाला. आयुष्य आणि क्रिकेटबद्दल महत्त्वाच्या गोष्टी तुमच्याकडून शिकायला मिळाल्या. यातून अजून आमच्यामध्ये सुधारणा होईल” असे राजवर्धनने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं होतं.

Ravi Kumar: 'काय आतापासूनच तू...' अंडर 19 वर्ल्डकपमधल्या मुलाने विचारलेल्या थेट भिडणाऱ्या प्रश्नावर विराटचं उत्तर
| Edited By: | Updated on: Feb 07, 2022 | 12:08 PM
Share

मुंबई: अंडर 19 वर्ल्डकपच्या फायनलआधी माजी कर्णधार विराट कोहलीने (Virat kohli) युवा संघासोबत व्हर्च्युअल संवाद साधला होता. त्याने इंग्लंड विरुद्धच्या (India vs England) फायनलआधी काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या होत्या. टीममधील खेळाडूंनी सुद्धा विराट सोबतच्या या व्हर्च्युअल संवादाचे स्क्रिनग्रॅब शेअर करुन खूप सुंदर अनुभव असल्याचं म्हटलं होतं. “विराट कोहली तुमच्यासोबत खूप चांगला संवाद झाला. आयुष्य आणि क्रिकेटबद्दल महत्त्वाच्या गोष्टी तुमच्याकडून शिकायला मिळाल्या. यातून अजून आमच्यामध्ये सुधारणा होईल” असे राजवर्धनने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं होतं. यावेळी युवा खेळाडूंनी सुद्धा विराट कोहलीला काही प्रश्न विचारले होते. डावखुरा वेगवान गोलंदाज रवी कुमारला (Ravi kumar) ज्यावेळी प्रश्न विचारण्याची संधी मिळाली, तेव्हा त्याने ‘तुझी कमकुवत बाजू काय आहे? असा थेट प्रश्न विचारला.’

त्यावर विराटने गमतीने ‘काय आतापासूनच मला आऊट करण्याची प्रॅक्टीस करतोयस का?’ असं म्हटलं. रवी कुमारने यंदाचा अंडर 19 वर्ल्डकप गाजवला. त्याने आपल्या स्विंग गोलंदाजीने प्रतिस्पर्धी संघांना तडाखा दिला. क्वार्टर फायनलमध्ये बांगलादेश आणि फायनलमध्ये इंग्लंडचा संघ त्याने सुरुवातीला दिलेल्या धक्क्यातून शेवटपर्यंत सावरु शकले नाही. मूळचा उत्तर प्रदेशचा पण आता बंगालकडून खेळणारा या तरुण खेळाडुने भविष्याबद्दल अपेक्षा निर्माण केली आहे.

त्याला पाहून न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टची आठवण येते फायनलमध्ये इंग्लंड विरुद्ध रवी कुमारने चार विकेट घेतल्या. रवी कुमार दुसरा भारताचा यशस्वी गोलंदाज आहे. त्याने सहा सामन्यात 13.20 च्या सरासरीने 3.66 इकॉनमीने 10 विकेट घेतल्या. भारताकडून विक्की ओस्टवालने सर्वाधिक 12 विकेट घेतल्या. अंडर 19 मधील या कामगिरीनंतर IPL 2022 च्या ऑक्शनमध्येही रवी कुमारवर जास्त बोली लागू शकते. वेग आणि स्विंग गोलंदाजी त्याची ताकत आहे. स्विंग चेंडूनी फलंदाजाला चकवण्याची त्याची क्षमता आहे. त्याची गोलंदाजी पाहून अनेकांना न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टची आठवण येते.

विराटने उत्तर टाळलं असेल, पण… विराटने रवी कुमारच्या प्रश्नाचं थेट उत्तर दिलं नाही. पण मैदानावर सध्या विराटचा फॉर्म फार चांगला नाहीय. वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये तो चार चेंडूत 8 धावा बनवून आऊट झाला. पुन्हा एकदा विराटच्या शॉट सिलेक्शनवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या: Hrishikesh Kanitkar: …आणि अंडर 19 वर्ल्डकप विजेत्या संघाचे पुणेकर कोच कानिटकरांनी पाकिस्तानला दिला होता तडाखा विराटचं मन थाऱ्यावर नाही, WI विरुद्धच्या 4 चेंडूंच्या खेळीनंतर आकाश चोप्राची सडकून टीका IND vs WI: ‘मी संघातील सदस्यांना सांगिन की…’,पहिल्या विजयानंतर रोहित शर्मा म्हणाला….

When U-19 star Ravi Kumar asked Virat Kohli What is your weakness?

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या