AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ZIM : झिम्बाब्वे विरूद्धच्या चौथ्या टी20 सामन्यात ‘यशस्वी’ भव:, 10 चौकार मारत ठोकलं अर्धशतक

चौथ्या टी20 सामन्यात भारतीय फलंदाजांनी झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना हैराण करून सोडलं. पहिल्या विकेटसाठी चांगलंच झुंजवलं. यशस्वी जयस्वालच्या आक्रमक खेळीपुढे अखेर नांगी टाकावी लागली. यशस्वीने 29 चेंडूत 50 धावा केल्या.

IND vs ZIM : झिम्बाब्वे विरूद्धच्या चौथ्या टी20 सामन्यात 'यशस्वी' भव:, 10 चौकार मारत ठोकलं अर्धशतक
Image Credit source: BCCI
| Updated on: Jul 13, 2024 | 7:04 PM
Share

भारत झिम्बाब्वे यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील चौथा आणि निर्णायक सामना सुरु आहे. नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला आणि शुबमन गिलने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात प्रथम फलंदाजी मिळाली म्हणून सिकंदर रझा खूश होता. मात्र शुबमन गिल आणि यशस्वी जयस्वाल पहिल्या सामन्यातील सर्व चुका चौथ्या सामन्यात दुरूस्त केल्या. यावेळी यशस्वी जयस्वालने जोरदार फटकेबाजी केली. अवघ्या 29 चेंडूत अर्धशतक झळकावलं. सिकंदर रझाच्या गोलंदाजीवर चौकार मारत त्याने आपलं अर्धशतक साजरं केलं. यावेळी त्याने 10 चौकार मारले होते. म्हणजेच 40 धावा या फक्त चौकार मारून कमवल्या होत्या. त्यामुळे अर्धशतकी खेळी करणं शक्य झालं. यशस्वी जयस्वालने पहिल्या षटकापासूनच आक्रमक पवित्रा घेतला होता. पहिल्या 6 चेंडूत त्याने 14 धावा काढल्या. यात तीन चौकारांचा समावेश होता.

दरम्यान, झिम्बाब्वेने 20 षटकात 7 गडी गमवून 152 धावा केल्या आणि विजयासाठी 153 धावांचं आव्हान दिलं आहे. हे आव्हान टीम इंडिया सहज गाठेल असंच चित्र आहे. या सामन्यातील विजयासह टीम इंडिया मालिकेत 3-1 ने आघाडी घेईल आणि मालिकाही खिशात टाकेल. शुबमन गिलच्या नेतृत्वात टीम इंडिया पहिलीच मालिका जिंकेल. दरम्यान आजचा सामना जिंकला तर रविवारी होणार सामना हा फक्त औपचारिक असणार आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

झिम्बाब्वे (प्लेइंग इलेव्हन): वेस्ली मधेवेरे, तादिवानाशे मारुमणी, ब्रायन बेनेट, डायन मायर्स, सिकंदर रझा (कर्णधार), जोनाथन कॅम्पबेल, फराज अक्रम, क्लाइव्ह मदांडे (विकेटकीपर), रिचर्ड नगारावा, ब्लेसिंग मुझाराबानी, तेंडाई चतारा.

भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल (कर्णधार), अभिषेक शर्मा, रुतुराज गायकवाड, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंग, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, तुषार देशपांडे, खलील अहमद

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी