India A vs Pakistan A Live Score Updates : भारताचा दणदणीत विजय, महिला ब्रिगेडने पाकिस्तानला 8 विकेट्सने लोळवलं
India vs Pakistan, ACC Womens Asia Cup Rising Stars 2026 Score And Highlights and In Marathi : वूमन्स आशिया कप रायजिंग स्टार्स 2026 स्पर्धेतील सहाव्या सामन्यात भारत ए संघाने कट्टर आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानला पराभूत केलं आहे. भारतीय महिला संघाने पाकिस्तानवर 8 विकेट्सने मात केली.

एसीसी वूमन्स आशिया कप 2026 स्पर्धेत इंडिया ए टीमने आपल्या पारंपरिक प्रतिस्पर्धी संघाला पराभूत करुन विजयाचं खातं उघडलं आहे. इंडिया ए वूमन्स टीमने पाकिस्तान ए संघावर 8 विकेट्सने दणदणीत असा विजय मिळवला आहे. भारताने बँकाकमध्ये खेळवण्यात आलेल्या या सामन्यात पाकिस्तानवर 59 बॉलआधीच विजय मिळवला. पाकिस्तानने टीम इंडियासमोर 94 धावांचं आव्हान ठेवलं होतं. इंडिया ए टीमने हे आव्हान वृंदा दिनेश हीच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर सहज पूर्ण केलं. भारताने 10.1 षटकात 97 धावा केल्या. भारतासाठी वृंदा गणेश हीने सर्वाधिक आणि नाबाद 55 धावा केल्या. वृंदाला तिने केलेल्या या कामगिरीसाठी तिला सामनावीर पुरस्कारने सन्मानित करण्यात आलं.
LIVE Cricket Score & Updates
-
IND A vs PAK A, Live Score Updates : भारताचा दणदणीत विजय, पाकिस्तानला लोळवलं
इंडिया ए टीमने राधा यादव हीच्या नेतृत्वात पाकिस्तान ए संघाचा एकतर्फी फरकाने धुव्वा उडवला आहे. भारताने यासह आशिया कप वुमन्स रायजिंग स्टार्स 2026 स्पर्धेतील आपल्या दुसऱ्या सामन्यात विजयाचं खातं उघडलं आहे. पाकिस्तानने भारतासमोर 94 धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारताने हे आव्हान 10.1 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून पूर्ण केलं.
-
IND A vs PAK A, Live Score Updates : भारताला दुसरा झटका, अनुष्का शर्मा आऊट
पाकिस्तानने भारताला दुसरा झटका दिला आहे. अनुष्का शर्मा आऊट झाली आहे. अनुष्काने 26 बॉलमध्ये 24 रन्स केल्या. अनुष्काने या खेळीत 4 फोर लगावले.
-
-
IND A vs PAK A, Live Score Updates : भारताची दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी, पाकिस्तानचा पराभव निश्चित
पाकिस्तानने भआरताला 94 धावांचा पाठलाग करताना पहिल्याच बॉलवर झटका दिला. हुमैरा काझी आऊट झाली. त्यानंतर आता दुसऱ्या विकेटसाठी अनुष्का शर्मा आणि वृंदा गणेश या दोघींनी अर्धशतकी भागीदारी केली आहे. या अर्धशतकी भागीदारीमुळे भारताचा विजयाची आता औपचारिकता बाकी आहे.
-
IND A vs PAK A, Live Score Updates : भारताला पहिल्याच बॉलवर झटका, ओपनर गोल्डन डक
पाकिस्तनाने भारतासोमर 94 धावांचं आव्हान ठेवलं आहे. पाकिस्तानने या विजयी धावांचा पाठलाग करणाऱ्या भारताच्या अ संघाला पहिल्याच बॉलवर झटका दिला आहे. वहीदा अख्तर हीने भारतीय फलंदार हुमैरा काझी हीला पहिल्याच बॉलवर नेहा शारमिन हीच्या हाती कॅच आऊट केलं.
-
IND A vs PAK A, Live Score Updates : पाकिस्तानचं पॅकअप, भारतासमोर 94 धावांचं आव्हान, किती ओव्हरमध्ये जिंकणार?
इंडिया ए वूमन्स टीमने पाकिस्तान ए संघांल 20 ओव्हरआधीच गुंडाळलं आहे. भारताने पाकिस्तानला 18.5 ओव्हरमध्ये 93 रन्सवर ऑलआऊट केलं आहे. त्यामुळे टीम इंडियाला विजयासाठी 94 धावाांचं माफक आव्हान मिळालं आहे. इंडियासाठी कॅप्टन राधा यादव, सायमा ठाकोर आणि प्रेमा रावत या तिघींनी व्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर जिंतामणी कलिता आणि मिन्नू मणी या दोघींनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
-
IND A vs PAK A, Live Score Updates : पाकिस्तानला आठवा झटका, 100 धावा होणार का?
टीम इंडियाने पाकिस्तानला आठवा झटक देत त्यांचं कंबरडं मोडलं आहे. टॉस जिंकून बॅटिंगसाठी आलेल्या पाकिस्तान टीमला भारतीय गोलंदाजांनी झटपट झटके दिले. त्यामुळे आता पाकिस्तानच्या 100 धावा तरी होणार का? तसेच पाकिस्तान 20 ओव्हर पूर्ण खेळण्यात समर्थ ठरणार का? हे पाहणं महत्त्त्वाचं ठरणार आहे.
-
IND A vs PAK A, Live Score Updates : पाकिस्तानची दुर्दशा, टीम इंडियाकडून सहावा झटका
टीम इंडियाच्या ए च्या गोलंदाजांसमोर पाकिस्तान ए संघाने गुडघे टेकले आहेत. भारताने पाकिस्तानला झटपट धक्के देत बॅकफुटवर टाकलं आहे. पाकिस्तानची 10 ओव्हरमध्ये 6 आऊट 46 अशी स्थिती झाली आहे.
-
IND A vs PAK A, Live Score Updates : पाकिस्तानला चौथा झटका, सायमा ठाकोरकडून कॅप्टनची शिकार
टीम इंडियाने पाकिस्तानला चौथा झटका दिला आहे. सायमा ठाकोर हीने पाकिस्तानची कॅप्टन हाफसा खालिद हीला 1 रनवर बोल्ड केलंय. त्यामुळे पाकिस्तानचा स्कोअर 4.4 ओव्हरमध्ये 4 आऊट 21 असा झाला आहे.
-
IND A vs PAK A, Live Score Updates : पाकिस्तानला एकाच ओव्हरमध्ये 2 झटके, टीम इंडियाची कडक सुरुवात
इंडिया ए टीमने पाकिस्तान विरुद्ध कडक सुुरुवात केलीय. सायमा टाकोर हीने पाकिस्तानला पहिल्याच ओव्हरमध्ये झटका दिला. त्यानंतर भारताने चौथ्या ओव्हरमध्ये पाकिस्तानला 2 झटके दिले आहेत. जितामनी कलिता हीने पहिल्याच बॉलवर ओमैमा सोहेल हीला विकेटकीपरच्या हाती 1 रनवर कॅच आऊट केलं. त्यानंतर चौथ्या चेंडूवर अनुष्का शर्माने एमान नासीर हीला 4 रन्सवर रन आऊट केलं.
-
IND A vs PAK A, Live Score Updates : भारताची जबदरस्त सुरुवात, पाकिस्तानला पहिल्या ओव्हरमध्ये झटका
सायमा ठाकोर हीने इंडिया ए टीमला जबरदस्त सुरुवात मिळवून दिली आहे. सायमाने पाकिस्तानला पहिल्याच ओव्हपमध्ये झटका दिला आहे. सायमाने युसरा आमीर हीला बोल्ड केलं आहे.
-
IND A vs PAK A, Live Updates : इंडिया ए प्लेइंग इलेव्हन
हुमैरा काझी, वृंदा दिनेश, तेजल हसबनीस, अनुष्का शर्मा, राधा यादव(कर्णधार), ममता माडीवाला(विकेटकीपर), तनुजा कंवर, प्रेमा रावत, मिन्नू मणी, सायमा ठाकोर आणि जिंतिमणी कलिता.
-
IND A vs PAK A, Live Updates : पाकिस्तानचा टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय
पाकिस्तान ए टीमच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आहे. पाकिस्तानची कॅप्टन हाफसा खालिद हीने टीम इंडिया विरुद्ध बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. टीम इंडिया पाकिस्तानला किती धावांपर्यंत रोखण्यात यशस्वी ठरते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
पाकिस्तान ए टीमने टॉस जिंकला
🚨 Toss 🚨
India A have been put into field first
Updates ▶️ https://t.co/NAZpc7cP1Y#WomensRisingStarsAsiaCup pic.twitter.com/pXaJVyhND6
— BCCI Women (@BCCIWomen) February 15, 2026
-
IND A vs PAK A, Live Updates : पाकिस्तान ए वुमन्स टीम
पाकिस्तान ए वुमन्स टीम : युसरा अमीर (विकेटकीपर), हाफसा खालिद (कॅप्टन) शवाल जुल्फिकार, हुरैना सज्जाद, गुल रुख, नूरीन याकूब, वहिदा अख्तर, इमान नसीर, अनोशा नसीर, मोमिना रियासत, सय्यदा मासूमा झहरा, उम्म-ए-हानी, लुबना बेहराम, कोमल खान आणि नेहा शर्मीन.
-
IND A vs PAK A, Live Updates : इंडिया ए टीम
इंडिया ए टीम : राधा यादव (कर्णधार), ममथा माडीवाला (विकेटकीपर), हुमैरा काझी, वृंदा दिनेश, तेजल हसबनीस, अनुष्का शर्मा, मिन्नू मणी, तनुजा कंवर, प्रेमा रावत, सायमा ठाकोर, नंदिनी कश्यप, सोनिया मेंढिया, जिंतीमणी कलिता, नंदनी शर्मा आणि दिया यादव.
-
IND A vs PAK A, Live Updates : इंडिया ए विरुद्ध पाकिस्तान ए सामना
वूमन्स आशिया कप रायजिंग स्टार्स 2026 स्पर्धेत इंडिया ए विरुद्ध पाकिस्तान ए यांच्यातील सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. हा सामना सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 12 वाजता टॉस होणार आहे. या सामन्याचं आयोजन हे बँकॉकमधील टेर्डथाई क्रिकेट ग्राउंडमध्ये करण्यात आलं आहे.